एशिया कप स्पर्धेत भारताचा सामना आज (23 सप्टेंबर) पाकिस्तान बरोबर होणार आहे. भारतीय संघ सुपर फॉर्ममध्ये असून गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघानी आपापले पहिले सुपर फोरचे सामने जिंकले आहेत.
रोहीत शर्मा आणि शिखर धवन ही भारताची सलामीची जोडी सर्वात विध्वंसक असल्याचे मत भारताचे माजी महान खेळाडू सुनिल गावसकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की फॉर्ममध्ये असलेला शिखर आणि दर्जेदार फलंदाज रोहित युएईमधील खेळपट्यांवर हे घातक ठरू शकतात.
गोलंदाज म्हणून केदार जाधवही घातक ठरू शकतो. कारण तो वेगवगळ्या कोनातून गोलंदाजी करत असतो. त्यामुळे त्याची लाइन ओळखने फलंदाला कठीण जाते. मागील सामन्यात रविंद्र जडेजाने देखील उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याची निवड योग्य असल्याचे निवड समितीच्या लक्षात आणून दिले आहे.
तिसऱ्या क्रमांकावर अंबाती रायडू चांगली करत आहे. क्रमांक चारवर धोनी आणि कार्तिक आलटून पालटून खेळले असले तरी सामन्यातील परिस्थिती नुसार निर्णय घेतील.
पाकिस्तानची भारत आणि अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात सुरुवात खराब झाली असली तरी त्यांची फलंदाजीत सुधारणा होऊ शकते. मागील दोन्ही सामन्यात फकर जमान फ्लॉप गेला असून तो फॉर्ममध्ये परतल्यास भारताची ़डोकेदुखी वाढू शकते.
शोएब मलिकने त्याचा अनुभव पणाला लावत पाकिस्तानला अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला आहे. त्याने जर मोठी भागीदारी रचली तर भारतासमोर अडचणी वाढू शकतात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना म्हटल्यावर अंदाज बांधणे कठीण असल्याचे शेवटी गावसकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
-एशिया कप २०१८: टीम इंडियासमोर अनपेक्षित पाकिस्तानचे कडवे आव्हान
-भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या या खेळाडूला आयसीसीने सुनावली ही मोठी शिक्षा
-टीम इंडियाविरुद्ध हे ३ खेळाडू पाकिस्तानला मिळवून देऊ शकतात एकहाती विजय