मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल 2023च्या 49व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 6 विकेट्सने दारुण पराभव केला. या हंगामात मुंबई संघ खराब फॉर्मचा सामना करत आहे. आयपीएल 2023मध्ये कर्णधार रोहित शर्मा याची बॅट फक्त एका सामन्यात तळपली. मात्र, नंतर तो खास कामगिरी करू शकला नाही. चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही रोहित शून्यावर तंबूत परतला. रोहितच्या या खराब फॉर्ममुळे आता भारताच्या माजी खेळाडूने त्याला गजब सल्ला दिला आहे.
काय म्हणाले श्रीकांत?
भारतीय संघाचे माजी खेळाडू के श्रीकांत (K Srikkanth) यांनी स्टार स्पोर्ट्सशी बातचीत केली. यावेळी त्यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी चर्चा करून सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “रोहित शर्माने त्याचे नाव बदलून नो हिट मॅन शर्मा केले पाहिजे. जर मी कर्णधार असतो, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही घेतलं नसतं.”
रोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
रोहित शर्मा याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 237 सामने खेळले आहेत. यामध्ये सर्वाधिक 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी तो सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी होता. मात्र, या यादीत तो आता सर्वात वर आला आहे. रोहितनंतर सुनील नारायण, मनदीप सिंग, दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू या खेळाडूंचाही समावेश आहे.
https://twitter.com/IPL/status/1654793486271664129
दहा सामन्यात फक्त 184 धावा
एकीकडे इतर फलंदाज 400 धावांचा आकडा पार करत आहेत, पण रोहित शर्मा अजूनही 200 धावांचा आकडा पार करण्यात संघर्ष करत आहे. रोहितने आयपीएल 2023मध्ये आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 18.40च्या सरासरीने फक्त 184 केल्या आहेत. रोहितने फक्त दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या एका सामन्यात 65 धावांची खेळी साकारली होती. फलंदाजी करताना रोहित या हंगामात दोन वेळा शून्यावर तंबूत परतला आहे. (rohit sharma should change his name to no hit man kris srikkanth statement read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कसोटी क्रिकेटपासून चार हात लांबच राहा…’, मुंबईला नमवल्यानंतर धोनीचे पथिरानाविषयी खळबळजनक वक्तव्य
“जितेश लवकरच भारतीय संघात दिसेल”, निवडसमिती सदस्याचे सूचक विधान