आयपीएल २०२१ च्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन तुल्यबळ संघ आमने-सामने आले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईचा डाव काहीसा गडगडला. मात्र, या सामन्यात मुंबईचा रोहित शर्माने अप्रतिम षटकार खेचला. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रोहितचा एकहाती षटकार
मुंबईच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा व यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने केली. डी कॉक केवळ २ धावा काढून बाद झाला. मात्र, रोहितने काहीसा आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. रविचंद्रन अश्विनने टाकलेल्या चौथ्या षटकात रोहित व सूर्यकुमार यादवने १५ धावा लुटल्या. या षटकातील अखेरच्या चेंडूवर रोहितने एका हाताने लॉंग ऑफला षटकार ठोकला. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. रोहितने अमित मिश्राच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी ३० चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४४ धावा ठोकल्या.
https://twitter.com/putitdownx/status/1384515840775622660?s=19
One hand six by Rohit Sharma against Ravi Ashwin. pic.twitter.com/hyeFEhlGl4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 20, 2021
मुंबईची सन्मानजनक धावसंख्या
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा पहिला लवकर बाद झाला. मात्र, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादवने दुसऱ्या गड्यासाठी ६७ धावा जमवल्या. हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या व कायरन पोलार्ड हे साफ अपयशी ठरले. ईशान किशन आणि जयंत यादव यांनी थोडाफार प्रतिकार करत मुंबईची धावसंख्या ९ बाद १३७ पर्यंत नेली. ईशानने २६ तर, जयंतने २३ धावा बनविल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणाने हार्दिक पंड्या करत नाहिये गोलंदाजी, मुंबईच्या प्रशिक्षकांचा खुलासा
दिल्ली विरूद्ध मुंबईच्या सामन्यात मोडले जाऊ शकतात ‘हे’ मोठे रेकॉर्ड्स