भारताचा हिटमॅन रोहित शर्माने त्याच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबतचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नरशी इंस्टाग्राम लाइव्ह व्हिडिओ चॅटवर बोलताना त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. सोबतच, तो त्याच्या कुटुंबाविषयीही बोलला आहे. Rohit-sharma-speaks-about-his-retirement.
रोहित म्हणाला की, ‘माझी क्रिकेट कारकिर्द वयाच्या ३८व्या वर्षापासून ते ३९व्या वर्षापर्यंत म्हणजेच २०२५-२६ यादरम्यान संपू शकते. कुटुंबाला वेळ देणे महत्त्वाचे असते. मी कोणत्याही क्रिकेट दौऱ्यावर गेल्यानंतर मला माझ्या कुंटुंबाची खूप आठवण येत असते. आजकाल मी माझा पूर्ण वेळ माझ्या कुंटुंबासोबत घालवत आहे.’
सध्या ३३ वर्षांचा असणारा रोहित पुढे म्हणाला की, ‘तुमची क्रिकेट कारकिर्द संपल्यानंतर तुमच्यासोबत केवळ तुमचे कुंटुंबच असते. माझी कारकिर्दीही वयाच्या ३८-३९व्या वर्षी संपून जाईल. त्यामुळे कुटुंबासोबत राहणे खूप महत्त्वाचे आहे.’
शिवाय ऑस्ट्रेलिया संघाविषयीही रोहितने त्याची मते मांडली आहेत. तो म्हणाला की, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला चांगले वाटते. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियालाच पराभूत करणे खास असते. असंच काहीसं वॉर्नरही बोलला. तो म्हणाला की, भारतात येऊन त्यांच्याविरुद्धच खेळायला मला खूप आवडते.
रोहितला इंस्टाग्रामवर लाइव्ह येण्यासाठी थोडा वेळ लागला होता. यावरून वॉर्नरने त्याचा सनरायझर्स हैद्राबाद संघातील संघसहकारी केन विलियम्सनची थट्टा करत त्याच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. वॉर्नर म्हणाला, “विलियम्सनला इंस्टाग्रामविषयी जास्त माहिती नाही. त्याला इंस्टावर लाइव्ह येण्यासाठी २०-२५ मिनिट लागले होते.” यावर रोहित आणि वॉर्नर खूप हसले.
ट्रेंडिंग घडामोडी-
भारताचा हा खेळाडू म्हणतोय, ‘धोनी फिट आहे आणि मला वाटते त्याने भारतासाठी खेळावे’
१९ व्या वर्षी काऊंटी क्रिकेट खेळल्याने झाला हा फायदा, सचिन तेंडुलकरने…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मोठे पाऊल; २ आठवड्यांसाठी…