---Advertisement---

भारताचा हा खेळाडू म्हणतोय, ‘धोनी फिट आहे आणि मला वाटते त्याने भारतासाठी खेळावे’

On: शनिवार, मे 9, 2020 12:55 PM
---Advertisement---

सध्या कोरोनामुळे सर्वच खेळप्रकार थांबले आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी प्रेक्षकांना अजून वाट बघायला लागणार असं दिसतंय.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीचे पुनरागमनही लांबणीवर पडले आहे. आयपीएलच्याद्वारे धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. याबाबतीत चायनामन गोलंदाज कुलदीप यादव म्हणतो कि धोनीचे भारतीय संघात असणे हे स्वतः कुलदीपसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच कुलदीप म्हणाला तो त्याला मिस करत असतो.

“मी स्वतः धोनीला मिस करत आहे. जेव्हा तुम्ही धोनीसारख्या खेळाडूंसोबत खेळता तेव्हा तुम्हाला त्यांचा सहवास आवडू लागतो आणि तुम्ही त्यांना मिस करू लागता.” कुलदीपने स्पोर्ट्सकिडाशी बोलताना सांगितले.

धोनीच्या निवृत्तीबाबत विचारले असता कुलदीप म्हणतो “तो संपूर्णपणे धोनीचा निर्णय आहे आणि तो त्यानीच घ्यायला हवा. आपण त्यावर चर्चा करून काही उपयोग नाही. तो तंदुरुस्त आहे आणि माझे व्यक्तिगत मत आहे की त्याने भारतासाठी खेळावे. एक चाहता म्हणून, मला धोनी प्रचंड आवडतो. जर तो खेळला तर आमच्यासाठीही काही गोष्टी सोप्या होतात.”

एमएस धोनीचे भारतीय संघातील पुनरागमन चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळतानाच्या कामगिरीवर अवलंबून होते. पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे धोनीला आता भारतीय संघात पुनरागमन करणे सोपे असणार नाही.

कुलदीपने धोनी व्यतिरिक्त शेन वॉर्नबद्दलही आपले मत मांडले आहे. २०१८-१९ च्या बॉर्डर-गावसकर ट्रोफीमध्ये वॉर्न कुलदिपला काही महत्वाच्या टिप्स देताना दिसला होता. याच लहानश्या सेशन नंतर कुलदीपने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनीमध्ये ५ विकेट घेतल्या होत्या. कुलदीप वॉर्नला आदर्श मानतो.

“शेन वॉर्न हा जगातला सर्वोत्कृष्ट स्पिनर आहे. त्याने माझ्या कारकिर्दीवर खूप मोठा प्रभाव पडला आहे. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि त्याच्याप्रमाणे गोलंदाजी करायचा प्रयत्न करतो. मी त्याच्यासारखी ५०% गोलंदाजी जरी करू शकलो तरी मी खूप काही मिळवू शकलो असं म्हणेल. तो माझ्यासाठी जगातला नेहमीच सर्वोत्कृष्ट स्पिनर आहे आणि राहील,” कुलदीप म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी – 

१९ व्या वर्षी काऊंटी क्रिकेट खेळल्याने झाला हा फायदा, सचिन तेंडुलकरने केला खूलासा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मोठे पाऊल; २ आठवड्यांसाठी…

पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतावर आरोप, मॅच फिक्सिंगचा गड आहे भारत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---