भारताचा माजी अषटपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा एमएस धोनीवर निशाना साधला आहे. ते धोनीबाबत प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, धोनीने युवा खेळाडूंसाठी काय केले आहे? Yograj singh blames ms dhoni and compres with sourav ganguly.
योगराज यांनी धोनीची तुलना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीशी केली आहे. ते म्हणाले की, “गांगुली म्हणजेच दादाने भारतीय क्रिकेटसाठी बरेच योगदान दिले आहे. त्याने युवा खेळाडूंसाठीही खूप काही केले होते. पण, धोनीने काय केलय?”
योगराज यांनी न्यूज २४शी बोलताना म्हटले की, “मला धोनीला विचारायचे आहे की त्याने एवढे वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर युवा खेळाडूंसाठी काय केले आहे? इतर क्रिकेटर्स धोनीची प्रशंसा करतात. पण, त्याने इतर क्रिकेटर्ससाठी काय केलय? गांगुलीची आकडेवारी उल्लेखनीय होती. तो आपल्या संघासाठी आणि देशासाठी एक विचार बनून गेला.”
योगराज यांनी धोनीची प्रशंसाही केली. ते म्हणाले की, “धोनी भारताच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत जे काही मिळवले आहे, त्यावरून त्याची महानता दिसून येते. पण, याबरोबरच संघात पक्षपातही केला जातो. संघाच्या बॉसशी जे खेळाडू चांगले वागतात, त्यांचीच बाजू घेतली जाते.’
तसेच योगराज यांना धोनीच्या पुनरागमाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर योगराज म्हणाले, “हे बोर्ड आणि निवडकर्त्यांवर निर्भर करते. जर धोनीला वाटले तर तो जाईल. नाही वाटले तर, नाही जाणार.”
विशेष म्हणजे, योगराज हे नेहमी धोनीवर निशाना साधत म्हणत असतात की, युवराजला संघाच्या बाहेर ठेवण्यात धोनीचाच हात आहे. कर्णधार असताना त्याने कधी युवराजसाठी प्रयत्न नाही केला. एवढेच नाही तर, युवराजनेही काहीदिवसांपूर्वी म्हटले आहे की, विराट कोहली आणि धोनीने मला तेवढे सहाय्य केले नाही, जेवढे गांगुलीने केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतावर आरोप, मॅच फिक्सिंगचा गड आहे भारत
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मोठे पाऊल; २ आठवड्यांसाठी…
१९ व्या वर्षी काऊंटी क्रिकेट खेळल्याने झाला हा फायदा, सचिन तेंडुलकरने…






