वनडे विश्वचषक 2023 मध्ये अखेरचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 160 धावांनी विजय मिळवत साखळी फेरीत अजिंक्य राहण्याचा कारनामा केला. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
अखेरच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर रोहित म्हणाला,
“जेव्हा विश्वचषक सुरू झाला तेव्हापासून आम्ही एकावेळी एकाच सामन्याचा विचार करत आलो आहोत. ही मोठी स्पर्धा असल्याने आम्ही फार दूरचा विचार करत नव्हतो. आमच्यासाठी सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी करणे गरजेचे होते आणि तेच घडत आहे. आम्ही एकमेव असा संघ होतो जो वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळलो आणि तेथील परिस्थिती पाहिली.”
या सामन्याबद्दल विचारले असता तो म्हणाला,
“आजच्या सामन्यात आमच्याकडे काही वेगळे करण्याची संधी होती. आम्हाला या सामन्यात नऊ गोलंदाजीचे पर्याय दिसले. आम्ही जे काही वेगळे केले त्याचा निकालही दिसला. तत्पूर्वी सर्वांनीच उत्कृष्ट फलंदाजी केली. खास करून श्रेयस व केएल अफलातून खेळले.”
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 410 धावा उभ्या केल्या होत्या. यामध्ये श्रेयस अय्यरने नाबाद शतक झळकावले तर केएल राहुलने देखील वेगवान शतक केले. त्याआधी रोहित, गिल व विराट यांनी देखील अर्धशतके पूर्ण केली होती. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ केवळ 250 पर्यंत पोहोचू शकला. त्यामुळे त्यांना 160 धावांनी पराभव पत्करावा लागला.
(Rohit Sharma Speaks After Beat Netherlands In ODI World Cup)
हेही वाचा-
गरज नसताना गोलंदाजांनी कशाला टाकले वाईड यॉर्कर? सामन्यानंतर रोहितचा सर्वात मोठा खुलासा, वाचा प्लॅन
9 पैकी 9 विजय मिळवल्यानंतर बोलला रोहित, म्हणाला, “वर्ल्डकप सुरू झाला तेव्हापासूनच…”