आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका समोरासमोर आले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. भारतीय संघाने श्रीलंकेची केवळ 55 धावांमध्ये दाणादाण उडवत 302 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत थाटात एन्ट्री केली. या सलग सातव्या विजयानंतर बोलताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांनी मोठे विधान केले.
उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला
“अधिकृतरित्या उपांत्य फेरी पोहोचलो याचा आनंद होत आहे. चेन्नईतून केलेली सुरुवात अव्यातपणे यशस्वीपणे इथपर्यंत आलेली आहे. हे संपूर्ण संघाचे यश आहे. या सातही सामन्यात ज्या प्रकारचा खेळ संघाने दाखवला त्याचे कौतुक करायला हवे. पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे आणि आम्ही यासाठी तयार आहोत. ते देखील चांगले क्रिकेट खेळत असून सामना रंगतदार होईल.”
रोहितने यावेळी श्रेयस अय्यर व मोहम्मद सिराज यांचे विशेष कौतुक केले
या सामन्या बद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाल्यानंतरही विराट व गिल यांनी 189 धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर याने देखील 82 धावा जोडत भारताला 357 पर्यंत पोहोचवले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव उभाच राहू शकला नाही. जसप्रीत बुमराह याने पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिल्यानंतर मोहम्मद सिराजने तीन व मोहम्मद शमी याने पाच बळी घेत श्रीलंकेचा डाव केवळ 55 धावांवर संपवला. शमी याला या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Rohit Sharma Speaks After Win Over Srilanka In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
जस्सी जैसा कोई नही! पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला दिला दणका
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने आणली धावांची त्सुनामी! विराट-गिलनंतर श्रेयस-जड्डूचा धमाका