---Advertisement---

तब्बल ५ महिन्यांनी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा सरावासाठी उतरला मैदानावर, पहा फोटो

On: शुक्रवार, जून 26, 2020 10:39 AM
---Advertisement---

मुंबई । लॉकडाऊन लागू असल्यामुळे मार्च महिन्यापासून भारतीय क्रिकेटपटू सराव करू शकले नाहीत. पण आता कोरोना महामारीच्या सावटात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी अभ्यासाला सुरुवात केली आहे. भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सचदेह मैदानावर वर्कआऊट करताना दिसून आले. त्यानंतर रोहित शर्माने त्याचे इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले.

रोहित शर्मा तर बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. तो न्यूझीलंड दौऱयात वनडे आणि टी 20 सामन्यात खेळला. मात्र, शेवटच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यानंतर तो कसोटी मालिकेत खेळला नाही. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याला कमबॅक करण्याची संधी होती. पण पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. पुढे कोरोनामुळे ही मालिका स्थगित करण्यात आली.

https://www.instagram.com/p/CB0g1wUhC1z/

रोहित शर्माने गेल्या पाच महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. अनेक दिवसांच्या गॅपनंतर तो पुन्हा मैदानावर सरावासाठी उतरला आहे. लॉकडाऊन नंतर सराव करण्यासाठी शार्दुल ठाकूर पहिल्यांदा मैदानात उतरला. त्यानंतर इतर खेळाडू आपल्या सरावास सुरुवात केली. बीसीसीआयने खेळाडूंना सराव करण्यासाठी कोणतीच परवानगी दिली नाही तरी देखील खेळाडू मैदानात सराव करताना दिसून येत आहेत. खेळाडूंच्या या वागण्यावर बीसीसीआय नाराज आहे.

रॉबिन उथप्पा, श्रेयस गोपाल, वॉशिंग्टन सुंदर आणि काही खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. याच आठवड्यात चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा देखील मैदानात सराव करताना दिसून आले. बीसीसीआय अधिकृतपणे भारतीय खेळाडूंच्या सरावाला कधीपासून परवानगी देणार आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---