---Advertisement---

“प्रत्येक सामना अश्विन आणि जडेजानेच जिंकवला पाहिजे असे नाही”, कर्णधार रोहितकडून अष्टपैलूंची पाठराखण

On: शनिवार, ऑक्टोबर 26, 2024 8:00 PM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर झालेला दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने 113 धवांनी गमावला. या सामना पराभवासह भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची 3 सामन्यांची कसोटी मालिका 0-2 अशा फरकासह गमावली आहे. मात्र मालिका गमावल्यानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूपच सकारात्मक दिसला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने संघाचा बचाव केला आणि सकारात्मक पैलूंबद्दल सांगितले. मात्र, दोन सामन्यांमध्ये झालेल्या चुकांचाही त्याने उल्लेख केला. याशिवाय प्रत्येक सामना फक्त अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानेच जिंकवला पाहिजे असे नाही, तर संघातील इतर खेळाडूंनाही ही जबाबदारी घ्यावी लागेल, असे मत रोहितने मांडले आहे.

रोहित म्हणाला, “जडेजा आणि अश्विनकडून तुम्हाला धावा करण्याची आणि विकेट्स घेण्याची खूप अपेक्षा आहे. या दोघांनीही भारतासाठी अनेकदा असे केले असले तरी प्रत्येक वेळी सामना जिंकवण्याची जबाबदारी या दोघांचीच नाही. संघातील इतर खेळाडूंनाही पुढे यावे लागेल. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही हातभार लावावा लागेल. जर एखादी व्यक्ती एकदा अपयशी ठरली तर त्याचा अर्थ असा नाही की त्याने काहीतरी चुकीचे केले आहे. दोघांनी भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि ते काय करू शकतात हे त्यांना माहीत आहे.”

12 वर्षांनंतर पहिली मालिका गमावली
भारताने 12 वर्षांनंतर घरच्या भूमीवर पहिली कसोटी मालिका गमावली आहे. 2012 साली इंग्लंडने शेवटच्या वेळी भारताला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. तेव्हापासून भारताने घरच्या मैदानावर एकूण 18 मालिका जिंकल्या आहेत. रोहित शर्मानेही 12 वर्षांनंतर मायदेशात मालिका गमावल्याच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाले की, मी 12 वर्षांपासून जिंकत आहे. पराभव एकदाच होतो.

याबाबत रोहित म्हणाला, “आम्ही 12 वर्षांपासून जिंकत आहोत. पराभव एकदा होईल मित्रा. भारतामध्ये प्रत्येक सामना आम्ही जिंकू. या संघाकडून खूप अपेक्षा आहेत आणि ही चाहत्यांची चूक नाही. गेल्या काही वर्षांत आम्ही हे केले आहे, त्यामुळे लोकांना आमच्याकडून आणखी अपेक्षा आहेत. आम्ही 18 मालिका जिंकल्या. याचा अर्थ आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. या दोन कसोटी सामन्यांमध्ये आम्ही खराब खेळलो असे नाही, आम्ही केलेल्या योजना यशस्वी झाल्या नाहीत एवढेच आणि मग विरोधी संघही इतकी वर्षे आम्हाला खेळताना पाहत आहे. तेही तयार होऊन येतात.”

हेही वाचा – 

टीम इंडियाची वाट बिकट! आता WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने
न्यूझीलंडनं अवघ्या 3 दिवसांत जिंकला सामना! भारताच्या दारुण पराभवामागचं कारण काय? जाणून घ्या
पुणे कसोटीत रोहित ब्रिगेडचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियानं घरच्या मैदानावर इतक्या दिवसांनी गमावली मालिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---