टी20 विश्वचषक जिंकून भारतात परतलेल्या टीम इंडियाने काल (4 जुलै) संध्याकाळी चाहत्यांसोबत जल्लोष साजरा केला. मरिन ड्राईव्हवर संघाची विजयी परेड पाहायला मिळाली आणि वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात चाहत्यांनीही खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. कालच्या जल्लोषानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रीमंडळाची विधानभवनात भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य सरकार कडून विश्वविजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी अभिनंदन करण्यासाठी विधानभवनात आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधानभवनात टी 20 विश्वविजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालसह सपोर्ट स्टाफचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी यशस्वी जयस्वालनं पाच शब्दात त्याचं भाषण संपवलं. तर शिवम दुबेनी आपल्या भाषणात म्हणाला की ,”माझ्या आयुष्यात असं होईल हे कधी वाटल नव्हतं. ज्याप्रकारे तुम्ही आमचं स्वागत केले त्याबद्दल धन्यावाद”.
यावेळी बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ” आम्हाला इथे आमत्रंण केल्या बद्दल सीएम सरांचे धन्यावाद. महाराष्ट्राच्या इतिहासात हा असा पहिलाच कार्यक्रम होत आहे त्यामुळे आनंद होत आहे. काल झालेल्या भव्य विजय परेड मध्ये मुंबईकरांनी आमच्यावर जे प्रेम दाखवलं त्यासाठी धन्यावाद. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला- सूर्यकुमारनी जो झेल घेतला तो चेंडू त्याच्या हातात बसला आणि तो अविश्वसनिय झेल झेलला, जर तो झेल सूर्याच्या हातून सुटला असता तर मी त्याला बसवलो असतो (हसून) म्हणाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संघाचे काैतुक करत भाषण केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, भारतीय संघाने ज्या पध्दतीने सामन्यात कामगिरी केली ते अविश्वसनीय होते. अंतिम षटकात भेदक गोलंदाजी करत सामना पलटवला. 17 वर्षानंतर भारतीय संघ पुन्हा टी20 विश्वविजेता ठरला यामुळे सर्वाचे अभिनंदन. एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. याआधी काल (4 जुलै) राज्य सरकारकडून रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षीस झाहीर झाले होते. विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी 11 कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली.
महत्तवाच्या बातम्या-
‘मी ही रडत होतो तो ही रडत होता’ वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात कोहलीनं केला मोठं खुलासा
रोहित-विराटच्या टी20 निवृत्ती बाबत सुरेश रैना खूपच भावूक, चक्क बीसीसीआयकडे केली विशेष मागणी
रोहितनं भर मैदानात असं काही सांगितलं, त्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये हार्दिकचं नाव दुमदुमलं