भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगात आहे. विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी अजून 332 धावा होल्या होत्या आणि संघाकडे 9 विकेट्स देखील होत्या. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने घेतलेल्या एक झेक चर्चेच कारण ठरत आहे. कर्णधाराने स्लिप्समध्ये पकडलेला हा झेल कौतुकास पात्र आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी ओली पोप (Oli Pope) याच्या रुपात भारताला पहिला झटका बसला. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने शेवटच्या डावातील 29व्या षटकात पोपला रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या हातात झेलबाद केले. षटकातील दुसरा चेंडू पोपच्या बॅटला लागून स्लिप्समध्ये कर्णधार रोहितच्या हातात गेला. सुरुवातीला अश्विनला देखील असे वाटले की, रोहितने हा झेल सोडला आहे. मात्र रोहितने अचूक वेळ साधून झेल पकडला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कर्णधार रोहितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Sharp Reflexes edition, ft. captain Rohit Sharma! 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @ImRo45 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/mPa0lUXC4C
— BCCI (@BCCI) February 5, 2024
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या जवळच्या मित्रानेच मोडला त्याचा विक्रम, पण क्रिकेटप्रेमी झालेत खूश, कौतूकाचा होतोय वर्षाव, जाणून घ्या!
अरेरे…दुर्दैवी अँजेलो! अफगाणी गोलंदाजांचा घाम काढत होता पठ्ठ्या, पण एक चूक झाली आणि तंबूत जावं लागलं – पाहा Video । Angelo Mathews