भारत आणि आणि ऑस्ट्रेलिया संघातील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे शुक्रवार(15 जानेवारी) पासून खेळला जात आहे. हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघाने आतापर्यंत चार सामन्यांतील तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यामुळे जो संघ चौथा सामना जिंकेल, तो मालिका विजेता ठरेल. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू प्रचंड चिकाटीने खेळत आहे.
यामध्ये पहिल्याच दिवशी रोहित शर्मा शर्माने उत्तम क्षेत्ररक्षण करताना डाईव्ह मारून उत्कृष्ट झेल टिपला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस हे दोघे अनुक्रमे 1 आणि 5 धावांवर बाद झाले. यापैकी डेविड वॉर्नरला मोहम्मद सिराजने बाद केले. डेविड वॉर्नरचा झेल स्लिपमध्ये उभा असलेल्या रोहित शर्माने उजव्या बाजूला उत्तम डाईव्ह मारत घेतला.
What a start by Siraj & a Top-notch catch by Rohit Sharma. Warner is out !! 🔥#GabbaTest#INDvsAUS pic.twitter.com/Yr8LsTjkBt
— vairag♡ (@vairag_) January 15, 2021
ब्रिस्बेन येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये चार बदल केले. यामध्ये शार्दूल ठाकूर, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक अगरवाल यांना खेळण्याची संधी दिली आहे. यापैकी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्याचबरोबर टी नटराजन हा भारतीय संघात एकाच दौऱ्यात तिन्ही फॉरमॅट पदार्पण करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच शार्दूल ठाकूरने दोन वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या पहिल्या दोन विकेट्स 17 धावसंख्येवर गमावल्या होत्या. त्यानंतर मार्नस लॅब्यूशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी तिसर्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ 77 चेंडूत 36 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मॅथ्यू वेड सोबत मार्नस लॅब्यूशानेने चौथ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. मॅथ्यू वेडने 87 चेंडू खेळत 45 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाकडून पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा मार्नस लॅब्यूशानेने केल्या. त्याने 204 चेंडूत 9 चौकार ठोकून 108 धावांची खेळी साकारली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवस अखेर 5 बाद 274 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड वॉर्नरचा रोहित शर्माने घेतला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
मार्नस लॅब्यूशेनने भारताविरुद्ध शतकी खेळी करत डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे, केला ‘हा’ खास रेकॉर्ड
कमाल! भुवनेश्वर कुमारनंतर ‘असा’ पराक्रम करणारा टी नटराजन दुसराच भारतीय