भारतीय क्रिकेट संघ आगामी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. याच कारणामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी20 मालिकेतही अनेक प्रयोग पाहायला मिळाले. यामुळे युवा खेळाडूंना टी20 मालिकेत संधी दिली जात आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला वरिष्ट खेळाडूंना विश्रांती देण्याच्या निर्णयाबाबत विचारले. त्याने याबाबत आश्चर्यचकीत करणारे उत्तर दिले आहे .
जेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma)ला विराट कोहली (Viart Kholi) टी20 प्रकारात खेळत नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, त्याने उत्तर दिले की, “हे विशवचषकचे वर्ष आहे. आम्हाला सर्वांना प्रसन्न ठेवायचे आहे. सर्वांचे लक्ष विराट आणि माझ्यावर आहे हे मला समजते पण जडेजाही खेळत नाही. याबद्दल तुम्हाला कधी प्रश्न पडत नाही का? गेल्या वर्षी टी20 विश्वचषकापूर्वी आम्ही कमी वनडे सामने खेळलो आणि आता विश्वचशकच्या दृष्टीने आम्ही टी20 ऐवजी अधिक वनडे सामने खेळत आहोत. याबाबत आम्ही दोन वर्षांपूर्वी योजना आखली होती.”
कर्णधाराने केले सूर्यकुमारचे समर्थन
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) टी20 प्रकारात अव्वल स्थानाचा फलंदाज आहे. त्याची टी20 मधली आकडेवारी ही खूपच कौतुकास्पद आहे. मात्र, वनडे प्रकारात सूर्यकुमारच गणित काही जुळत नाही. वनडे प्रकारात संघासाठी त्याची कामगीरी खूपच निराशाजनक आहे. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान कर्णधार रोहितला सूर्यकुमारच्या वनडे फॉर्मबद्दलही विचारण्यात आले.
तेव्हा रोहित म्हणाला की, “सूर्यकुमार यावर खूप मेहनत घेत आहे आणि ज्यांना वनडे प्रकारात खेळण्याचा अधिक अनुभव आहे त्यांच्याशी बोलत आहे. त्याच्यासारख्या फलंदाजाला अधिक संधी देण्याची गरज आहे. जेणेकरून त्याला त्याची लय आणि आत्मविश्वास मिळेल. आयपीएलच्या या मोसमात सूर्याची सुरुवात चांगली झाली नाही, पण नंतर त्याने आपला फॉर्म कसा दाखवला हे आपल्या सर्वांना माहीत आहे.” (rohit sharma talk about why not playing virat kohli in t20i)
महत्वाच्या बातम्या-
रोहितलाच नाही स्वतःच्या निवडीची गॅरंटी! म्हणाला, “प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल”
“तो एक्स फॅक्टर ठरेल”, एकसाथ चार दिग्गजांनी वर्ल्डकपसाठी दिली तिलकला पसंती