---Advertisement---

‘या गोष्टीचे परिणाम येणाऱ्या काळात जाणवतील’, इंग्लंड दौऱ्याबाबत कर्णधार रोहित शर्माचे मोठे विधान

On: गुरूवार, जुलै 7, 2022 4:18 PM
Rohit-Sharma-Test
---Advertisement---

सध्या भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पूर्वनियोजित पाचव्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने तो अनुपस्थित राहिला. त्यामुळे भारताचे नेतृत्व पहिल्यांदाच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे गेल. याबाबत आता रोहित शर्माने स्पष्टीकरण दिले आहे. “एजबॅस्टन कसोटीतील पराभवाचा दीर्घकाळात काय परिणाम होईल हे येणारा काळच सांगेल”, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने बुधवारी सांगितले.

आजवर २००७ नंतर भारताचा इंग्लंडमध्ये पहिला मालिका विजय हुकला आहे. शिवाय यजमानांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला. त्यामुळे हा पराभव भारताच्या अधिक जिव्हारी लागल्याची चिन्हे दिसत आहेत.

पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी रोहित म्हणाला की, “जिंकणे न मिळणे निराशाजनक आहे. भारताने कसोटी मालिका जिंकायला हवी होती. टी२० किंवा एकदिवसीय मालिकेवर त्याचा कितपत परिणाम होतो हे येणारा काळच सांगेल.”

कोरोना संसर्गामुळे रोहित एजबॅस्टन कसोटी खेळू शकला नाही. नुकतेच आयर्लंडविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक हा भारतीय रणनीतीचा भाग असल्याचेही कर्णधाराने म्हटले आहे.

रोहित म्हणाला की, “उमरानचा समावेश आमच्या रणनीतीत आहे. आम्ही सध्या त्याला त्याची भूमिका समजावून सांगत आहोत आणि संघाला त्याच्याकडून काय हवे आहे.” कोरोनामधून बरा झाल्यानंतर रोहितने प्रथमच सराव सत्रात भाग घेतला. तो म्हणाला की, “टी२० मालिकेतून कळेल की टी२० विश्वचषकापूर्वी संघाची स्थिती काय आहे. या वर्षाच्या अखेरीस विश्वचषक होणार आहे, त्यामुळे ही मालिका महत्त्वाची आहे आणि प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.”

दरम्यान, गुरुवार ७ जुलै रोजी भारत आणि इंग्लड या दोन्ही संघांदरम्यान पहिला टी२० सामना खेळवला जाईल. या सामन्यात कर्णधार म्हणून रोहित शर्मा वापसी करेल अशी आशा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

प्रतिक्षा संपली! अखेर भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, वाचा कधी आणि कुठे होणार सामना

‘हा फोटो कधीचा…?’, असे विचारत सचिनने दिल्या दिग्गजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘फॉर्ममध्ये परतण्यासाठी आराम हा पर्याय नाही’, संघव्यवस्थापनावर भारतीय दिग्गज भडकला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---