---Advertisement---

दुखापतींपासून वाचण्यासाठी ‘हिटमॅन’ करतोय ‘हे’ काम, स्वत:च केला खुलासा

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 8:41 PM
---Advertisement---

भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा आपल्या कारकीर्दीत अनेकदा दुखापतीमुळे बऱ्याच सामन्यांना मुकला आहे. आयपीएलच्या चालू हंगामात रोहित आपल्या तंदुरुस्तीकडे प्रामुख्याने लक्ष देत आहे. सध्या तो कशा पद्धतीने मेहनत घेत आहे, त्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने नुकताच शेअर केला आहे.

मागील हंगामात दुखापतग्रस्त झाला होता रोहित
मागील आयपीएल हंगामात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो साखळी फेरीतील काही सामन्यांना मुकला होता. स्पर्धेच्या नॉक आउट फेरीत तो खेळला. मात्र, तो १०० टक्के तंदुरुस्त नव्हता. त्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे व टी२० मालिकेसाठी त्याला निवडले गेले नाही व तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी बंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठविण्यात आले.

पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर तो कसोटी मालिकेत खेळला व त्यानंतर सातत्याने तो भारतीय संघासाठी खेळत आहे. आता जवळपास दोन महिने रोहित आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.

शरीरावर विशेष लक्ष देतोय
मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये, रोहित ‘कॅप्टन कॉर्नर’ च्या भागामध्ये आपल्या तंदुरुस्तीविषयी बोलताना दिसत आहे. तो म्हणाला, “मागील तीन-चार महिन्यांपासून मी तंदुरुस्तीवर लक्ष देत आहे. मागील आयपीएलमध्ये मी दुखापतग्रस्त झालो होतो. त्यामुळे शरीराच्या खालच्या भागावर सध्या मी विशेष लक्ष देतोय.”

दुसऱ्या सामन्यासाठी तयार
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी आपला संघ तयार असल्याचे रोहितने म्हटले. तो म्हणाला, “एक संघ म्हणून आम्ही सर्व गोष्टी करत असतो. आमची कायम क्रिकेटबाबतच चर्चा होत असल्याने संघात चांगला ताळमेळ राहतो. दरवेळी संघात नवीन चेहरे आणि नवीन स्टाफ येत असतो. त्यामुळे आमची एकजुट महत्त्वाची आहे.”

रोहित सध्या आयपीएलमध्ये २०० पेक्षा अधिक सामने खेळला आहे आणि आणखी २०० सामने खेळण्याचा मनोदय त्याने बोलून दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या –

तीन कारण की ज्यामुळे चेतन सकारिया बनू शकतो भारतीय संघांचे भविष्य

‘तेव्हा रिचर्डसन मला शाळकरी मुलासारखा वाटला होता’, भारतीय दिग्गजाने सांगितली मजेशीर आठवण

“मला विश्वास आहे, तो नक्की पुनरागमन करेल”, कुलदीप यादवच्या मदतीला धावला भारतीय दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---