भारतीय संघ १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी १ जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला पोहोचला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत शेवटचा सामना पुढे ढकलावा लागला. या मालिकेत भारत सध्या २-१ ने पुढे आहे.
आफ्रिदीला हरवण्याची संधी
कसोटी सामन्यानंतर ७ जुलै ते १७ जुलै दरम्यान तीन सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाईल. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माला एका खास प्रकरणात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला मागे टाकण्याची संधी आहे. आफ्रिदी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्माच्या पुढे आहे. या दौऱ्यात रोहित आफ्रिदीला मागे टाकू शकतो.
रोहितला १३ षटकार मारायचे आहेत
पाकिस्तानी दिग्गज शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७६ षटकार मारले आहेत, तर रोहित शर्माने आतापर्यंत ४६४ षटकार मारले आहेत. या दौऱ्यात १३ षटकार मारताच रोहित आफ्रिदीला मागे टाकेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने एकूण ५५३ षटकार ठोकले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
ख्रिस गेल – ५३३ षटकार
शाहिद आफ्रिदी – ४७६ षटकार
रोहित शर्मा – ४७६ षटकार
ब्रेंडन मॅक्क्युलम – ३९८ षटकार
मार्टिन गप्टिल – ३७१ षटकार
T20 मालिकेचे वेळापत्रक
पहिली टी२०: ७ जुलै, एजेस बाउल
दुसरी टी२०: ९ जुलै, एजबॅस्टन
तिसरा टी२०: १० जुलै, ट्रेंट ब्रिज
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिली वनडे: १२ जुलै, ओव्हल
दुसरी वनडे: १४ जुलै, लॉर्ड्स
तिसरी वनडे: १७ जुलै, मँचेस्टर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोहलीला खेळताना बघण्यासाठी पठ्ठ्याने थेट शाळेलाच मारली दांडी!, फोटो होतोय व्हायरल
हिटमॅनने केलेले ‘हे’ विक्रम मोडणे जवळपास अशक्यच, वाचा सविस्तर