सध्या भारतभर सर्वत्र होळी (Holi) आणि धुळवड (Dhulwad) हे सण धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. अगदी क्रिकेटपटूही या सणांचा आनंद घेत आहेत. इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या निमित्ताने भारतीय आणि परदेशी खेळाडू मुंबईमध्ये एकत्र जमले आहेत. अशात प्रत्येक फ्रँचायझीतील खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करत आहेत आणि चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही देत आहेत. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने धमाल व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या भारतीय क्रिकेट संघातील अधिकतर खेळाडू आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या तयारीसाठी मुंबईत आहेत. आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहितही (Rohit Sharma) त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबईत आहे. यादरम्यान त्याने हॉटेलच्या खोलीतून त्याच्या चाहत्यांसाठी होळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ शूट (Holi Wishing Video) केला. यावेळी त्याला बरेच रिटेकही (Rohit Sharma Took Many Retakes) घ्यावे लागले, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचे चांगलेच मनोंरजन झाले आहे.
रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, रोहित त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी रितीका सजदेहही (Ritika Sajdeh) दिसत आहे. व्हिडिओत रोहित परत-परत त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देणारा संदेश बोलत आहे, परंतु तो पुन्हा-पुन्हा त्यात अपयशी होतो आहे. मध्ये त्याची पत्नी रितीकाही त्याला त्यासाठी मदत करताना दिसतेय. अखेर तो यशस्वीपणे चाहत्यांना शुभेच्छा देतो.
हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत रोहितने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी फक्त हेच सांगू इच्छितोय की, होळीच्या शुभेच्छा.’
https://www.instagram.com/reel/CbO0QBbjKAP/?utm_source=ig_web_copy_link
मुंबई इंडियन्सने केले ट्रोल
मुंबई इंडियन्सनेही रोहितचा हा मजेशीर व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर त्यांनी गमतीशीर कॅप्शन देत लिहिले आहे की, हे कोणत्या लाईनमध्ये आला कर्णधार साहेब. ५३२६१ रिटेक्सनंतर रोने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
Ye kis line mein aa gaye aap, Captain saab? 🤭
After 53261 takes, Ro wishes everyone a very Happy Holi! 🤣💙#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/bb3FJj1reX
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2022
दरम्यान मुंबई इंडियन्सचा पहिला आयपीएल सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २७ मार्च रोजी होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
मुंबई इंडियन्स संघ – रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टिळक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन ऍलन
महत्त्वाच्या बातम्या-
सुरेश रैनाला आयपीएल लिलावात का मिळाला नाही खरेदीदार? कुमार संगकाराने स्पष्ट केले कारण
रोहित आणि रहाणेला शार्दुलने बनवले बॉडीगार्ड, बघून रितीका सजदेहने केलं ट्रोल, पाहा काय म्हणाली
कर्णधार रोहितने त्याच्याच मित्राच्या कारकिर्दीवर लावले ग्रहण, ‘मॅच विनर’ खेळाडूला कसोटीत मिळेना संधी