भारतीय संघाने २०२१ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केलेली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत मागे पडला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका वाढला आहे. आधी पाकिस्तानकडून १० गड्यांनी पराभव, नंतर न्यूझीलंडकडून ८ गड्यांनी पराभव, यामुळे भारताच्या अडचणीत वाढल्या आहेत.
आता भारताला बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानवर कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. अशा स्थितीत या सामन्यापूर्वी भारतीय नेट सत्रात वेगळेच दृश्य पाहायला मिळाले.
नेट सत्रादरम्यान, भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा गोलंदाजीत हात आजमावताना दिसला. त्याचवेळी पाठदुखीमुळे न्यूझीलंडविरुद्ध संघाबाहेर असलेल्या सूर्यकुमार यादवनेही नेटमध्ये पुनरागमन केले. भारताला आता तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. तसेच, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड संघ प्रत्येकी एक-एक सामना हरल्यावरच भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा होईल. भारतालाही पुढच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रनरेट सुधारावा लागेल.
सूर्यकुमारने नेट सेशनमध्ये हलके जॉगिंग करून सरावाला सुरुवात केली. यानंतर त्याने सहाय्यक प्रशिक्षक सोहम देसाई यांच्या देखरेखीखाली फिटनेस ड्रिल देखील केले. एका बातमीनुसार, सराव सत्र संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक एमएस धोनी रणनीतीवर चर्चा करताना दिसले.
Talk about getting into the groove ???? ????@imVkohli | @ImRo45 #TeamIndia #T20WorldCup #INDvAFG pic.twitter.com/utXY9tSOKE
— BCCI (@BCCI) November 3, 2021
That's some hitting, @imjadeja ! ???? ????#TeamIndia #T20WorldCup #INDvAFG pic.twitter.com/Yf89bCRlB1
— BCCI (@BCCI) November 3, 2021
खराब फलंदाजी, गोलंदाजी, सांघिक संयोजन यासाठी आधीच टीकेचा सामना करत असलेल्या भारतीय संघाची अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेली एक छोटीशी चूक त्यांना स्पर्धेतून सरळ बाहेर फेकेल. अशा स्थितीत, भारतीय संघाला आधीच्या सामन्यात झालेल्या चुकीची पुनरावृत्ती टाळावी लागेल. कारण अफगाणिस्तानचा संघ हा सध्या चांगल्या लयीत आहे. अफगाणिस्तान संघ सध्या गट २ मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“अफगाणिस्तान असा संघ नाहीये, ज्याला तुम्ही सहजासहजी पराभूत कराल”
अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर टीम इंडियासाठी महत्त्वाचे ठरू शकतात हे ५ फॅक्टर
टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठल्यानंतरही ‘या’ बाबतीत पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम संघावर नाखूष






