भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवचे 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी20 अशा मालिकांसाठी भारताच्या संघात पुनरागमन झाले आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून केदार फलंदाजी करताना संघर्ष करत आहे.
त्याला मागील अनेक दिवसांपासून मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडीजविरुद्ध त्याला पुन्हा एकदा त्याची लय परत मिळवण्याची संधी असेल. तसेच 9 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही केदार महाराष्ट्राकडून खेळताना दिसेल.
त्यामुळे तो सध्या सराव करताना दिसत आहे. या सरावा दरम्यानचे फोटो केदारने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला केदारने कॅप्शन दिले आहे की ‘मैदानावर परत येऊन आणि मला जे आवडते ते करताना छान वाटत आहे.’
पण भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मात्र केदारच्या या पोस्टवर त्याला ट्रोल केले आहे. रोहितने केदारला या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे की ‘पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा (पोज कमी कर आणि थोडी फलंदाजी कर).’

रोहित अनेकदा केदारच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत असतो. तसेच अनेकदा तर या दोघांमध्ये कमेंट सेक्शनमध्ये मराठीत संभाषण पहायलाही मिळते.
आता रोहित आणि केदार वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघात सामील होतील. वेस्ट इंडीज विरुद्धची टी20 मालिका 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यानंतर 15 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरु होईल.
https://twitter.com/JadhavKedar/status/1202116023018606594
गांगुली म्हणतो, त्याच्या बायोपिकमध्ये 'या' अभिनेत्याने करावे काम
वाचा- ????https://t.co/7fXdqoWmtD????#म #मराठी #souravganguly #cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 4, 2019






