---Advertisement---

रोहितने चाहत्यांसाठी केले ट्विट, दिला ‘हा’ शब्द

On: गुरूवार, मे 27, 2021 11:56 PM
---Advertisement---

सध्या क्रिकेट बंद असल्याने सर्व खेळाडू आपला फावला वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत. खेळाडू आपल्या दैनंदिन घटनांची छायाचित्रे व व्हिडिओ वारंवार शेअर करताना दिसतायेत. तर, काही खेळाडू याच सोशल मीडियावर मुलाखती देतायेत. काहीजण चाहत्यांशी गप्पा मारत आहेत. भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने देखील नुकतेच एक छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध केला आहे. या ट्विटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय.

रोहितने केले हे ट्विट
भारताच्या वनडे व टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सातत्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट शेअर करत असतो. त्याने नुकतेच आपल्या ट्विटरवरून एक छायाचित्र केले. हे ट्विट त्याने आपल्या चाहत्यांसाठी केले असून त्याला कॅप्शन देताना लिहिले, ‘मित्रांनो, आपण या रियुनियनची वाट पाहतोय!’
त्याच्या या ट्विटला अल्पावधीतच चाहत्यांनी भरपूर प्रेम देत लाईक, रिट्विट व कमेंट केल्या. अनेकांनी त्याला आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

भारतीय संघ आहे क्वारंटाईन
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी सध्या संपूर्ण भारतीय संघ मुंबई येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये क्वारंटाईन असून, संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. भारत सर्वप्रथम या दौऱ्यावर न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका ऑगस्ट महिन्यात सुरू होईल.

रोहितकडून आहेत अपेक्षा
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ व चाहत्यांना रोहित शर्माकडून अनेक अपेक्षा असतील. संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी रोहितवर असेल. रोहितने आत्तापर्यंत या स्पर्धेत ११ सामन्यांच्या १७ डावांमध्ये ६४.३७ च्या लाजवाब सरासरीने १०३० धावा जमविल्या आहेत. यामध्ये ४ शतके व २ अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका दौऱ्यासाठी हर्षा भोगलेंनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, पाहा कोणाला दिली संधी

वाढदिवशी पण शास्त्री गुरूजी ट्विटरवर ट्रोल, पाहा काही भन्नाट मिम्स

५ कमनशिबी कर्णधार, ज्यांना केवळ एकाच टी२० सामन्यात मिळाली नेतृत्वाची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---