भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत समालोचन करत आहे. त्याने नुकतच भारतीय सलामीवीर रोहित शर्माची मुलाखत घेतली. ज्याचा प्रोमो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. यामध्ये त्याने रोहितबद्दल एक खुलासा केला आहे.
या प्रोमोमध्ये रोहित आणि कार्तिक एका कॅफेच्या बाहेर बसलेले दिसत आहेत आणि मजेशीर चर्चा होत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिकने खुलासा केला आहे की, रोहित रितिका सजदेहच्या येण्यापूर्वी काय करत असायचा.
या प्रश्नाचे उत्तर देताना, रोहित हसला आणि त्याने कार्तिकला विचारले की, “तुला कोणी सांगितले की मी ‘सूर्यवंशम’ बघायचो.”
रोहित चित्रपटातील भावनिक दृश्ये पाहून रडायचा
त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये कार्तिकने खुलासा केला की, रितिका सजदेहशी लग्न करण्यापूर्वी रोहित शर्मा वेगळा माणूस होता. ‘सूर्यवंशम’सारख्या चित्रपटातील भावनिक दृश्य पाहून स्टार सलामीवीर रडत असायचा, असे म्हणत त्याने रोहितची खिल्ली देखील उडवली. दिनेश कार्तिकने स्वतः आणि रोहित शर्मा यांच्यातील संभाषणाचा एक छोटा ट्रेलर शेअर केला आहे. आता चाहते या पूर्ण मुलाखतीची वाट पाहत आहेत, जे 12 ऑगस्टपासून लॉर्ड्स टेस्ट दरम्यान दाखवले जाईल.
https://www.instagram.com/p/CSbvjUNI0eU/?utm_source=ig_web_copy_link
पहिल्या कसोटीत रोहित-राहुल यांच्यात 97 धावांची भागीदारी झाली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघममध्ये झालेला पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 157 धावा करायच्या होत्या आणि 9 विकेट शिल्लक होत्या. मात्र, पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला.
A sneak peek into the interview with @ImRo45. Will be out tomorrow during the 2nd #ENGvIND Test.
P.S. Sorry Sham for revealing all those secrets about you 🤪 pic.twitter.com/wXQaADcbxk
— DK (@DineshKarthik) August 11, 2021
या सामन्यात केएल राहुलने रोहितसह डावाची सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी झाली. गेल्या 14 वर्षांत इंग्लंडमध्ये भारतासाठी पहिल्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी होती. रोहितने 36 आणि केएल राहुलने पहिल्या डावात 84 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-कारकिर्दीतील १२ वर्षे झोपेशी लढत राहिला ‘मास्टर ब्लास्टर’, पाहा शेवटी कसा मिळवला तोडगा?
-‘नातं पक्कचं समजायच म्हणजे’! राहुलच्या शतकाने सुनिल शेट्टी इंप्रेस, अशी प्रतिक्रिया देत वेधले लक्ष
-चेन्नईमागून मुंबईची बाजी, धोनीच्या संघाला ‘या’ गोष्टीसाठी युएई सरकारकडून नकार; वाढल्या अडचणी