---Advertisement---

श्रीलंकेत असूनही दुरावा, भारताच्या 6 खेळाडूंचा वेगळा सराव; कोच गंभीरच्या डोक्यात नेमकं काय आहे?

On: मंगळवार, जुलै 30, 2024 6:42 PM
---Advertisement---

India vs Sri Lanka ODI series: श्रीलंका आणि भारत (SL vs IND) यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (30 जुलै) खेळला जाणार आहे. हा सामना देखील पल्लेकेले येथेच खेळला जाईल. या सामन्यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा वेगळा सराव सुरू असल्याचे वृत्त आहे.

सध्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ पल्लेकेले येथे टी20 मालिका खेळतोय. त्यामुळे वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेले खेळाडू, थेट कोलंबो येथे पोहोचले आहेत. उभय संघांमधील वनडे मालिका कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळली जाईल. या मालिकेसाठी सहा खेळाडू नव्याने भारतीय संघाशी जोडले गेलेत. ते श्रीलंका येथे पोहोचल्याची छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट झाली.

केवळ वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), अनुभवी विराट कोहली (Virat Kohli), यष्टीरक्षक केएल राहुल (KL Rahul), पुनरागमन करत असलेला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), फिरकीपटू कुलदीप यादव व वेगवान गोलंदाज हर्षित राणा आहेत. या सर्व खेळाडूंनी कोलंबो येथे पोहोचून वनडे मालिकेची तयारी सुरू केल्याचे सांगण्यात येतेय.

उभय संघातील पहिला वनडे सामना 2 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 4 ऑगस्ट रोजी तर तिसरा सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अनुषंगाने ही मालिका महत्त्वाची मानली जातेय.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, रियान पराग, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, अर्शदीप सिंग व मोहम्मद सिराज.

हेही वाचा – 

सूर्या शॉर्ट टर्म ऑप्शन…! टी20 मालिका जिंकूनही दिग्गजाने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वावर उपस्थित केले प्रश्न

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी नेमबाजी स्पर्धा कशी खेळली जाते? नियम व अटी काय असतात?
शूटिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा, पदकाच्या लढतीत 20 वर्षीय रमिता जिंदालचं स्वप्न भंगलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---