भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जरी टी20 वर्ल्डकप जिंकला असला, तरी त्यानंतर त्याचा फोर्म खालावत गेला. नुकत्याच झालेल्या बाॅर्डर-गावस्कर ट्रॉफीत त्याचा फॉर्म खूपच खराब राहिला. या मालिकेत अनुभवी फलंदाज विराट कोहलीची कामगिरी सुद्धा खराब राहिली. हे दोघेही संपूर्ण मालिकेत धावांसाठी झगडताना दिसले.
रोहित शर्माने 2024 मध्ये 24 सामन्यांत 24.76 च्या सरासरीने 619 धावा केल्या असून तर विराट कोहलीने 19 सामन्यांत 24.52 च्या सरासरीने 417 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित आणि विराट काही खास कामगिरी करु शकले नाही, ज्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू या दोघांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देत आहेत. यामध्ये रवी शास्त्री यांचं नाव देखील सामील झालं आहे.
आयसीसीच्या रिव्ह्युमध्ये संवाद साधताना रवी शास्त्री म्हणाले, “देशांतर्गत क्रिकेट खेळल्यामुळे केवळ त्यांचा फॉर्म परत येणार नाही, तर यामुळे युवा खेळाडूंना सल्ला देण्यासाठी पण मदत होईल.” शास्त्री पुढे म्हणाले, “जर त्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांनी देशांर्तगत क्रिकेट खेळावे. याद्वारे युवा खेळाडूंना आपले अनुभव शेअर करता येतील.” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली ऑफ स्टंम्प बाहेरील चेंडूवर वारंवार बाद झाला. यावर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “समोरच्या टीममधील खेळाडू चांगल्या फोर्ममध्ये असतील तर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. यावर तोडगा काढन्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे हा एकच उपाय आहे”.
ते पुढे म्हणाले की, आता ही जबाबदारी रोहित आणि विराटची असणार आहे. सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा सारख्या अनुभवी खेळाडूंचे उदाहरण देत शास्त्री म्हणाले, “अनुभवी खेळाडू केवळ संघासाठी महत्त्वपूर्ण नसतात, तर ते युवा खेळाडूंसाठी सुद्धा महत्त्वाचे असतात. युवा खेळाडूंना त्यांच्याकडे पाहून खेळण्याची ऊर्जा मिळते. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, रोहित शर्माने 2016 मध्ये, तर विराट कोहलीने 2012 मध्ये शेवटचा देशांतर्गत सामना खेळला होता.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून केएल राहुलचा पत्ता कट होणार? या दिग्गज खेळाडूचं स्थानही धोक्यात
बुमराह नाही, तर हा खेळाडू होणार रोहित शर्मानंतर भारताचा पुढील कर्णधार; माजी खेळाडूचा धक्कादायक दावा!
आयसीसी रँकिंगमध्ये रिषभ पंतला मोठा फायदा, जसप्रीत बुमराहने इतिहास रचला!