भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (10 जानेवारी) गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातून भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू संघपुनरागमन करत आहेत. यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्मा भारतीय कर्णधाराच्या रुपात दिसणार आहे. त्याचबरोबर संघात विराट कोहली, केएल राहुल, मोहम्मद शमी हे खेळाडूही परतत आहेत. वनडे विश्वचषक 2023च्या आधी भारत ही मालिका खेळणार असून सुरूवात चांगली करण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल आणि नाणेफेकची भुमिका काय ते पाहू.
गुवाहाटीच्या बरसापरा स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा होण्याची शक्यता आहे. यामुळे गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे. या खेळपट्टीवर आतापर्यंत एकच वनडे सामना खेळला गेला. जो भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 2018मध्ये खेळला गेला. त्या सामन्यात भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली प्रथम क्षेत्ररक्षण निवडले होते. त्यामध्ये विराटने 140 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर रोहित शर्मा याने नाबाद 152 धावा केल्या होत्या. यामुळे भारताने 322 धावांचे लक्ष्य 8 विकेट्स आणि 47 चेंडू राखतच जिंकले होते.
त्याचबरोबर या मैदानावर तीन आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले गेले. ज्यातील दोन सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले, तर एका सामन्याचा निकालच लागला नाही. हे निकाल पाहता जो कर्णधार नाणेफेक जिंकेल तो लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेण्याची अधिक शक्यता आहे.
वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
श्रीलंका- दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चरिथ असलंका, अशान बंडारा, वानिंदु हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदु फर्नांडो, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, पथुम निसंका, प्रमोद मदुशन, कासुन रजिथा, सादीरा समरविक्रमा, महीश तीक्षणा, जेफ्री वांदरसे, दुनिथ वेलालगे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्रान्सचा गोलकीपर-कॅप्टन ह्यूगो लॉरिसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, रिप्लेसमेंटचे नावही सांगितले
INDvSL: वनडेमध्ये रोहित-विराट, सूर्या नाहीतर ‘हा’ खेळाडू टीम इंडियाचा प्राण! पाहा भारताची प्लेईंग इलेव्हन