आज (03 जानेवारी) सिडनी कसोटी सामन्याच्या दिवशी सकाळी जेव्हा जसप्रीत बुमराह नाणेफेकीसाठी भारतीय जर्सीमध्ये दिसला तेव्हा रोहित शर्मा या सामन्यात खेळणार नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. कर्णधार असलेल्या बुमराहने सांगितले की, रोहितने स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे. असा निर्णय घेणे हे त्याचे नेतृत्व दर्शवते असेही तो म्हणाला. मात्र, संघाच्या पत्रकात त्याचे नावही दिसत नसल्याने आश्चर्याचा धक्का बसला. अशा स्थितीत त्याला दुधातल्या माशीप्रमाणे संघाबाहेर फेकले गेले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित शर्माच्या जागी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पत्रकार परिषदेला आला. ज्यात त्याने रोहित शर्माबद्दल जवळजवळ स्पष्ट केले की रोहित कदाचित सिडनीमध्ये खेळणार नाही. रोहित शर्मा नेटमध्ये आणि कॅचिंग ड्रिलमध्ये दिसला नसतानाही मेलबर्न टेस्ट ही रोहित शर्माची या दौऱ्यातील शेवटची टेस्ट असल्याचं सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. शुक्रवार, ३ जानेवारी रोजी सकाळी हा प्रकार घडला. आता भारताची पुढची कसोटी 6 महिन्यांनी आहे. अशा स्थितीत रोहितची कसोटी कारकीर्द जवळपास संपल्याचे बोलले जात आहे.
Rohit Sharma hasn’t stepped out with the rest of the squad & his name no longer appears in the squad list either. A different meaning to “opted to rest” perhaps #AusvInd pic.twitter.com/yRb203Rmni
— Bharat Sundaresan (@beastieboy07) January 2, 2025
सामान्यत: एखादा खेळाडू वगळला तर त्याचे नाव संघाच्या यादीत असते. पण कर्णधार जसप्रीत बुमराहने स्वत:ला संघाबाहेर ठेवल्याचे म्हणणे योग्यच आहे. यामुळे तो संघाच्या यादीतही नव्हता. त्याला या सामन्यात कोणत्याही प्रकारे सहभागी होता येणार नाही. आकाश दीप जखमी झाला आहे. अशा परिस्थितीत त्याचाही या यादीत समावेश नाही. मात्र, रोहित पहिल्या दिवशी ड्रेसिंग रूममध्ये दिसला. या सामन्यात त्याच्या जागी शुबमन गिल खेळत आहे. पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर खेळत असलेल्या शुबमन गिलला केवळ 20 धावा केल्या आणि पुन्हा सलामीला आलेल्या केएल राहुलला फार काही करता आले नाही.
हेही वाचा-
IND VS AUS; सिडनी कसोटीत भारतीय संघाचा टॉप ऑर्डर पुन्हा फ्लॉप!
वारंवार तेच.! विराट कोहलीची पुन्हा तीच चुकी, सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही फ्लाॅप
IND vs AUS; ‘रोहित शर्मा’ला विश्रांती की खराब फॉर्ममुळे प्लेईंग 11 मधून वगळले?