बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान रविचंद्रन अश्विननं निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. मालिकेच्या अखेरीस आणखी एका निवृत्तीच्या बातम्या आल्या होत्या, परंतु तसं झालं नाही. आता ताज्या वृत्तांनुसार, दुसरी निवृत्ती कर्णधार रोहित शर्माची होती.
रिपोर्टनुसार, मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीनंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणणार होता. पण त्याच्या एका हितचिंतकाच्या सल्ल्यानुसार त्यानं आपला निर्णय बदलला आणि निवृत्ती घेतली नाही. हिटमॅनच्या निवृत्ती न घेण्याच्या निर्णयावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाराज असल्याचं बोललं जात आहे.
रोहित शर्मा मुलाच्या जन्मामुळे मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नाही. जेव्हा तो अॅडलेड कसोटीत परतला तेव्हा तो मधल्या फळीत खेळला कारण पर्थमध्ये डावाची सुरुवात करताना केएल राहुलनं चांगली कामगिरी केली होती. रोहित अॅडलेड आणि गाबा दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला. शेवटी त्यानं पुन्हा डावाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे शुबमन गिलला बाहेर बसावं लागलं आणि केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर आला. रोहितची ही युक्ती कामी आली नाही आणि तो मेलबर्नमध्येही अपयशी ठरला. यानंतर रोहित शर्मानं निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
‘टाईम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, रविचंद्रन अश्विननंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणारा दुसरा भारतीय खेळाडू असू शकला असता. एका सूत्रानं सांगितलं की, रोहितनं मेलबर्न कसोटीनंतर निवृत्तीचं मन बनवलं होतं. परंतु त्याच्या जवळच्या काही लोकांनी आग्रह केल्यानंतर त्यानं आपला विचार बदलला.
रोहितचा हा निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला आवडला नाही. त्यामुेच रोहित सिडनीमधील शेवटच्या कसोटीत खेळला नाही, असं म्हटलं जातं आहे. गंभीर आणि रोहित यांचे अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. दोघांवरही मोठी कामगिरी करण्याचा दबाव आहे. त्यामुळे आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची स्पर्धा असू शकते.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहची फिटनेस चिंताजनक
2024 च्या टी20 वर्ल्ड कपनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा कोणी केल्या? यादी आश्चर्यकरणारी!
मुंबई इंडियन्समध्ये निवड होताच आयसीसी स्पर्धेचं कर्णधारपद मिळालं, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किवी संघ जाहीर