मुंबई इंडियन्समध्ये निवड होताच आयसीसी स्पर्धेचं कर्णधारपद मिळालं, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किवी संघ जाहीर

पाकिस्तान आणि यूएई येथे होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडने त्यांचा संघ जाहीर केला आहे. या मेगा स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा दुसरा संघ ठरला आहे. त्याआधी इंग्लंडने संघ जाहीर केला होता. आयसीसीने सर्व संघांना त्यांचे तात्पुरते संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. परंतु सर्व संघांना 1 महिन्यासाठी कोणत्याही परवानगीशिवाय संघात बदल करण्याचे स्वातंत्र्य असेल. न्यूझीलंडच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली एकूण 14 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. दरवेळीप्रमाणे यावेळीही न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा अनोख्या पद्धतीने केली आहे.
न्यूझीलंडचा संघ निवडकर्त्यांनी किंवा प्रशिक्षकांनी जाहीर केलेला नाही. परंतु कर्णधार मिचेल सँटनरने स्वतः आपला संघ जाहीर केला आहे. ब्लॅककॅप्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर मिचेल सँटनरचा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये सँटनरने खुलासा केला की संघात मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम आणि डॅरिल मिशेल यांचा समावेश असेल. याशिवाय, संघात 23 वर्षीय विल ओ’रोर्कचाही समावेश असेल. त्याच्यासाठी ही त्याची पहिलीच आयसीसी स्पर्धा असणार आहे.
तसेच या संघात ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बीन सीअर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.
चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 साठी न्यूझीलंड संघ – मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बीन सीअर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग
New Zealand Mitchell Santner has announced the team for Champions Trophy. 🇳🇿
– WHAT A GREAT WAY TO ANNOUNCE THE TEAM..!!!!👌😀pic.twitter.com/rFdMfVZ0Vx
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 12, 2025
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत. ज्यांना प्रत्येकी 4 असे दोन गटात विभागण्यात आले आहे. भारतासोबत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांना ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. तर ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचे संघ असतील.
दोन्ही गटांमधील टॉप 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळवला जाईल.
हेही वाचा-
टीम इंडियात युवराज सिंगसारखा एकच फलंदाज; माजी प्रशिक्षकाने केला खळबळजनक दावा
IND vs ENG: या आयपीएल कर्णधाराला टीम इंडियात स्थान नाही, खराब फॉर्म ठरलं कारण?
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत या खेळाडूकडे उपकर्णधारपद, हार्दिककडे पुन्हा दुर्लक्ष