---Advertisement---

वनडे, टी२०त विराटचीच जागा घेणाऱ्या रोहित कसोटी कर्णधारपदाच्या निर्णयावरून सदम्यात, म्हणाला…

On: रविवार, जानेवारी 16, 2022 2:58 PM
Virat-Kohli-Rohit-Sharma, Test
---Advertisement---

भारताचा संंघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून शुक्रवार रोजी (१४ जानेवारी) उभय संघांमधील ३ सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. या मालिकेतील केपटाऊन येथे झालेला तिसरा कसोटी सामना ७ विकेट्सने गमावत भारताने १-२ च्या फरकाने ही मालिकाही गमावली आहे. यानंतर शनिवारी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने तडकाफडकी कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडण्याचा (Virat Kohli Step Down As Test Captain) निर्णय घेतला आहे.

त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेटविश्वातून प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे. अशातच भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यानेही आपली प्रतिक्रिया नोंदवली (Rohit Sharma reaction) आहे. तो विराटच्या या निर्णयाने आश्चर्यचकित झाला असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’

विराटच्या निर्णयानंतर रोहितने त्याचा आणि आपला कसोटीची जर्सी घातलेला मैदानातील फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, धक्कादायक!! पण भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तू मिळवलेल्या यशासाठी तुचे अभिनंदन. तसेच पुढील वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा. 

विराटने कोणत्या स्वरुपात भारतीय संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर रोहितने दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. यापूर्वी विराटने टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाच्या नेतृत्त्वापदावरून राजीनामा दिला होता. तसेच पुढे त्याच्याकडून वनडे संघाची सुत्रेही काढून घेण्यात आली होती. यावेळी रोहितने कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

https://www.instagram.com/p/CYxsaeuKf17/?utm_source=ig_web_button_share_sheet

गांगुलीनेही दिली प्रतिक्रिया
रोहितबरोबरच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही पहिल्यांदाच विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर बोलले आहेत. विराटने कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. यादरम्यान गांगुलीने विराटच्या निर्णयावर ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

गांगुलीने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने तिन्ही स्वरुपात शानदार प्रदर्शन केले आहे. हा विराटचा वैयक्तिक निर्णय आहे आणि बीसीसीआय त्याच्या निर्णयाचा सन्मान करते. तो आताही भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे आणि पुढेही राहिल. संघाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यात त्याचा मोलाचा वाटा पुढेही असाच राहिल. तो एक महान खेळाडू आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

कोहलीचा कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय ‘या’ क्रिकेटरच्या उतरेना गळ्याखाली; माजी कर्णधाराला म्हटला, ‘बॅड लूजर’

अंडर-१९ विश्वचषकात ‘यंगिस्तान’चा धमाका, दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत स्पर्धेची केली विजयी सुरुवात

चार महिन्यांआधी कोहलीच होता ‘किंग’..! पण ‘या’ निर्णयांमुळं पालटलं सारं चित्र आणि हातून निसटली कॅप्टन्सी

हेही पाहा-

कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही... बोलतोय 'किंग कोहली' । Virat Kohli Press Conference

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---