इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२२ हंगामात पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे. रोहित कर्णधाराच्या रूपात पहिल्या पाच सामन्यात अपयशी ठरलाच आहे, पण त्याचे वैयक्तिक प्रदर्शन देखील खूपच खराब राहिले आहे. शनिवारी (१६ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला रोहित शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला आणि संघाच्या अडचणी वाढवल्या. रोहितच्या या खराब खेळीनंतर नेटकरी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करू लागले आहेत.
लखनऊविरुद्धचा हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. लखनऊ सुपर जायंट्सने विजयासाठी मुंबईला २०० धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) पूर्णपणे मोठी खेळी करू शकले नाहीत. रोहित या संपूर्ण हंगामात खराब खेळी करत आला आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच संघाच्या एकंदरीत प्रदर्शनावर पडत आहे. अशातच लखनऊविरुद्धच्या या सामन्यात रोहित अवघ्या ६ धावांवार बाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
रोहितने ७ चेंडू खेळले आणि यामध्ये ६ धावा केल्या. या छोट्या खेळीनंतर नेटकरी त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत. या धावा करण्यासाठी त्याने २ चौकार देखील ठोकले. लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खानने रोहितला यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातात झेलबाद केले. रोहितचे चाहते त्याच्या या प्रदर्शनानंतर चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होते आहेत. काही नेटकरी रोहितला संघातून बाहेर बसवण्याची मागणी करत आहेत, तर काहीजण मजेशीर मीम्स शेअर करत आहेत.
खराब फॉर्ममुळे रोहित शर्मा ट्रोल
#RohitSharma Is a finished Player Now. You have to admit it 🤐
He scored just 6 runs of 7 delivery's.. #TATAIPL #MIvsLSG #IPL2022 pic.twitter.com/E1CMcjto7M
— Himanshu Mishra (@Hima_nshu17) April 16, 2022
@mipaltan @ImRo45 कसम से आज रोहित शर्मा की कप्तानी और बल्लेबाजी देखकर बहुत मन गुस्सा में है , इतना दवाब क्यो और किस लिए ,बहुत घटिया खेल खेला रोहित तुमने 😫😫😫
— Niranjan Kumar Pathak (@Niranja20039108) April 16, 2022
https://twitter.com/Amit_shriyal/status/1515303508157005829?s=20&t=lulE6X9YgDHu6GrZu5MX3Q
https://twitter.com/iThunder_Dk/status/1515303512564928516?s=20&t=mp4c9e_SogtYG3i_YdsMOg
#SachinTendulkar out – TV bandh karo #RohitSharma out – TV bandh karo#MIvsLSG #IPL2022
— Ansh Gupta (@TraderAnsh) April 16, 2022
When will u score atleast one half century man..It's very disheartening to see u like this..@ImRo45 #MIvLSG
— Sanjay (@Sanjy010) April 16, 2022
@ImRo45 🥲 pic.twitter.com/RQwyTlcEqv
— Aditya Kulkarni (@kul_karnism) April 16, 2022
Imagine 16cr for this knock #RohitSharma𓃟 #LSGvMI pic.twitter.com/6MYnNegBeP
— Savyasachi࿗ (@Savyasanchi_) April 16, 2022
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. कर्णधार केएल राहुलच्या (१०३) शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने ४ विकेट्सच्या नुकसानावर १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्ये सलामीवीर रोहित आणि ईशान अनुक्रमे ६ आणि १३ धावांवर बाद झाले. डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते, पण ते देखील अनुक्रमे ३१ आणि ३७ धावा करून बाद झाले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मुंबईच्या सामन्यासाठी ‘तेंडूलकर कुटुंबा’ची हजेरी, अंजली आणि सारा तेंडूलकर ठरल्या चाहत्यांचे आकर्षण
रुसवा, फुगवा की संधी न मिळण्यामागची निराशा? वडील सचिनच्या शेजारी तोंड पाडून बसलेला दिसला अर्जुन