इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला बुधवारी (२९ जून) मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा १ जुलैपासून ऍजबस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या पुनर्निधारित पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता.
अशात माध्यमांतील वृत्तांनुसार, आता इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कर्णधार म्हणून निवडले गेले असल्याची माहिती पुढे येत आहे. संघाच्या बैठकीत बुमराहला याबद्दल माहिती दिली गेली असल्याचे म्हटले जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ऍजबस्टन येथेच मैदानावर भारतीय संघाची बैठक झाली, जिथे सांगितले गेले की, रोहित पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाचा भाग नसेल आणि त्याच्याजागी जसप्रीत बुमराह नेतृत्त्व करेल. रोहित लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कोरोना संक्रमित झाला होता. त्यानंतर त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. बुधवारी आणखी एकदा त्याची कोरोना चाचणी केली जाणार होती. परंतु आता तो इंग्लंडविरुद्ध खेळणारच नसल्याचे समजत आहे.
जसप्रीत बुमराह करेल विक्रम
भारतीय क्रिकेटमध्ये शक्यतो खूप कमी वेळा वेगवान गोलंदाजांना संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. दिग्गज कपिल देव (kapil Dev) याला अपवाद ठरतात. कपिलने १९८७ मध्ये कर्णधाराच्या रूपात भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तब्बल ३५ वर्ष झाले, पण एकाही वेगवान गोलंदाजाने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले नाहीये. इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात मात्र जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ही परंपरा मोडू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर चा कहर! आता तर थेट विराटचाच विक्रम केलाय स्वत:च्या नावावर
रोहित-राहुल नाही तर ‘ही’ जोडी भारतासाठी ठरलेय सुपरहिट! रचली सर्वात मोठी भागिदारी
टीम इंडियाचं ठरलंय! अशी असेल इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारताची ‘प्लेइंग ११’