बुधवारी(११ नोव्हेंबर) भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दुबईतून सिडनी येथे रवाना झाला. मात्र यावेळी भारतीय संघासह सलामीवीर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला गेलेला नाही. तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएलचे पाचवे विजेतेपद मिळवल्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी भारतात परतणार आहे.
सुरुवातीला या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कोणत्याच मालिकेसाठी रोहित शर्माची भारतीय संघात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे निवड करण्यात आली नव्हती. त्याला १८ ऑक्टोबरला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळताना ही दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला मुंबईच्या ४ सामन्यांना मुकावे लागले. पण त्याने मुंबईच्या शेवटच्या साखळी सामन्यातून मैदानात पुनरागमन करत तो दुखापतीतून सावरला असल्याचे संकेत दिले.
त्यानंतर त्याचा ९ नोव्हेंबरला बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला. पण मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली आहे.
त्यामुळे आता रोहित भारतात परत येऊन बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करेल. तिथे तो तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तो कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबर ते १९ जानेवारीपर्यंत खेळला जाणार आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी मालिका होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
….म्हणून इयत्ता नववीच्या वर्गातच रोहित बनला होता शालेय संघाचा कर्णधार
हम तैयार है..! बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचे खास फोटो प्रसिद्ध
भारताच्या जावईसह ‘या’ दोन खेळाडूंना पाकिस्तान संघातून डच्चू, पाहा पूर्ण टीम
ट्रेंडिंग लेख –
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
आयपीएल २०२०: एकेकाळी मैदान गाजवणारे ५ मोठे खेळाडू; या हंगामात ठरले सपशेल फ्लॉप