भारताचा फलंदाज रोहित शर्मा याने केलेल्या 264 धावाही कमी पडल्या जेव्हा 21 नोव्हेंबरला तमिळनाडुचा फलंदाज एन जगदीसन याने 277 धावांची खेळी वनडे क्रिकेटमध्ये खेळली. हा सामना स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील होता, मात्र लिस्ट एच्या क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या जगदीसनने आपल्या नावावर नोंदवली आहे. हा विक्रम करताना त्याने ऍलिस्टर ब्राऊन आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे.
उजव्या हाताचा सलामीचा फलंदाज-विकेटकीपर नारायण जगदीसन (Narayan Jagadeesan) याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये लागोपाठ 5 शतके करण्याचा विश्वविक्रमही केला. त्यानंतर त्याने सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करत विश्वविक्रम केला. त्याने सोमवारी (21 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध 141 चेंडूत 25 चौकार आणि 15 षटकारांच्या सहाय्याने 277 धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.
एन जगदीसन याच्याआधी ऍलिस्टर ब्राउन याने 2002मध्ये ग्लॅमॉर्गनविरुद्ध सरेकडून 268 धावांची खेळी केली होती. तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध 2014मध्ये 264 धावांची खेळी केली होती. 2018मध्ये डार्सी शॉर्ट याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळताना क्विन्सलॅंड विरुद्ध 257 धावा केल्या होत्या. या यादीत भारताचा प्रभारी वनडे कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याचाही समावेश आहे. त्याने 2013मध्ये इंडिया ए कडून दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध 248 धावा केल्या होत्या.
एवढेच नाहीतर जगदीसनने साई सुदर्शन याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 416 धावांची भागीदारी केली. जी वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. या सामन्यात जगदीसनने 196.45च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. त्याचबरोबर साई सुदर्शन याने 102 चेंडूत 154 धावा केल्या. या दोन्ही स्फोटक सलामी खेळींमुळे तमिळनाडूने 50 षटकात 2 विकेट्स गमावत 506 धावसंख्या उभारली. Rohit Sharma’s 264 runs fell short, Narayan Jagadeesan made a record innings of 277 runs
https://twitter.com/Master__Cricket/status/1594589439036121089?s=20&t=tO_6BexXSY7L9PW83pLOcg
लिस्ट-ए मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या-
277 – एन जगदीसन (तमिळनाडु, भारत) वि. अरुणाचल, 2022
268 – ऍलिस्टर ब्राउन (सरे, इंग्लंड) वि. ग्लॅमॉर्गन, 2002
264 – रोहित शर्मा (भारत) वि. श्रीलंका, 2014
257 – डी’आर्सी शॉर्ट (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया) विरुद्ध क्वीन्सलँड, 2018
248 – शिखर धवन (भारत अ) विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ, 2013
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एन जगदीसनचा वनडे क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; विराट कोहली, कुमार संगकाराला टाकले मागे
पहिल्या सामन्यातच फुटबॉल विश्वचषकाचा 92 वर्ष जुना विक्रम मोडीत, कतारवर इक्वेडोर पडले भारी