भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात रविवारी (६ फेब्रुवारी) झाली. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजी आक्रमणाने चांगले प्रदर्शन केले आणि वेस्ट इंडीलला २०० धावांचा टप्पाही गाठू दिला नाही. भारताचा युवा गोलंदाजी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचे प्रदर्शन कौतुकास पात्र होते. तसेच, कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणादरम्यान चांगले निर्णय घेतले.
सुंदरने या सामन्यात एकूण तीन विकेट्स घेतल्या. यासाठी त्याने ९ षटके टाकली आणि ३० धावा खर्च केल्या. सुंदरने वेस्ट इंडीजच्या वरच्या फळीतील दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या डॅरेन ब्रावो (dareen bravo) याला स्वस्तात तंबूत पाठवले. सुंदरने १२ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर डॅरेनला पायचीत पकडले.
पंचांनी सुरुवातीला सुंदरच्या अपीलवर कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण नंतर कर्णधार रोहितने सुंदरसोबत चर्चा करून रिव्ह्यू घेतला. हा रिव्ह्यू विरोधात गेला असता तरी अंपायर्स कॉलमुळे संघाचा रिव्ह् वाया गेला नसता. रिव्ह्यूमध्ये चेंडू फलंदाजाच्या बॅटला स्पर्श न करता पॅडला जाऊन लागला असल्याचे दिसले. जर फलंदाजाचा पाय मध्ये नसता, तर तो थेट स्टंपला लागत होता. रिव्ह्यूनंतर पंचानी स्वतःचा निर्णय बदलला आणि डॅरेन ब्रावोला खेळपट्टी सोडावी लागली. रिव्ह् घेताना सुंदर आणि रोहित यांच्यातील चर्चा स्टंप माईकमध्ये कैद झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/cric_zoom/status/1490256485623865344?s=20&t=pIvTlDVKTg_Fj90Wx6nsyw
दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. मोहम्मद सिराजने वेस्ट इंडीजला शाई होपच्या रूपात पहिला झटका दिला. त्यानंतर सुंदरने एकाच षटकात ब्रँडन किंग आणि डॅरेन ब्रावो यांच्या विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडीजने ७९ धावांच्या टप्प्यापर ७ महत्वाच्या विकेट्स गमावल्या होता. पुढे संघ १७६ धावांवर सर्वबाद झाला.
भारतासाठी युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. चहलने टाकलेल्या ९.५ षटकात ४९ धावा खर्च करून ही कामगिरी केली. त्यानंतर, सुंदरने तीन विकेट्स घेण्यासाठी ९ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ३० धावा खर्च केल्या. मोहम्मद सिराजला सामन्यात एक विकेट घेता आली, तर प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
ताजमहालासमोर डिविलियर्सने पत्नीला प्रपोज तर केले, पण घडलेली ‘ही’ मजेशीर गोष्ट, स्वत: एबीचाच खुलासा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने ‘अशाप्रकारे’ लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज