---Advertisement---

Video: ऐतिहासिक सामना खेळत असतानाही लतादिदींना टीम इंडिया विसरली नाही, अशी वाहिलीये श्रद्धांजली

On: रविवार, फेब्रुवारी 6, 2022 2:06 PM
Team-India-and-Lata-Mangeshkar
---Advertisement---

अहमदाबाद। रविवारी (६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून उतरल्याचे दिसले होते. यामागच्या कारण बीसीसीआयकडून आणि बीसीसीआय उपअध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. 

राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडू पहिल्या वनडेत दंडाला काळी पट्टी बांधून उतरले. तसेच यावेळी राष्ट्रध्वज देखील अर्ध्यावर फडकवण्यात येणार असल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले होते. याशिवाय भारतीय संघाने एक मिनिट मौन देखील पाळले.

याबद्दल बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली की, ‘भारतीय क्रिकेट संघ आज भारतरत्न लता मंगेशकरजी यांच्या सन्मानार्थ दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. मधूर आवाजाची राणी असलेल्या लता दिदींना क्रिकेटबद्दल प्रेम होते. त्यांनी नेहमीच या खेळाचे आणि भारतीय संघाचे समर्थन केले होते.’

याबरोबरच सामन्यापूर्वी भारतीय संघाने एक मिनिट शांतता पाळत लता मंगेशकरांना श्रद्धांजली देखील दिली. या क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

लता मंगशकरांचे रविवारी सकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर या क्रिकेटप्रेमी देखील होत्या. त्यांनी अनेकदा भारतीय संघाबद्दल आणि भारतीय क्रिकेटपटूंसाठी विविध मतं मांडताना ट्वीट केले होते. त्यातही मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी त्यांचे फार चांगेल संबंध होते.

बीसीसीआयने ट्वीट करत देखील लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. बीसीसीआयने ट्वीटमध्ये म्हटले की, ‘भारतरत्न लता मंगेशकरत यांच्या निधनाबद्दल संपूर्ण देशाला झालेल्या दु:खात बीसीसीआय सहभागी आहे. सुंदर आवाजाच्या राणीने अनेक दशके देशाला मंत्रमुग्ध केले होते. खेळाच्या चाहत्या असलेल्या आणि भारतीय संघाच्या समर्थक राहिलेल्या लता मंगेशकरांनी संगीताचा माध्यम म्हणून वापर करून जागरूकता निर्माण करण्यात मदत केली होती.’

https://twitter.com/BCCI/status/1490214127289405442

भारताचा १००० वा वनडे सामना 
वेस्ट इंडिजविरुद्ध रविवारी झालेला सामना भारतासाठी १००० वा वनडे सामना ठरला होता. १००० वनडे सामने खेळणारा भारत पहिलाच संघ ठरला. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने ९५८ वनडे सामने खेळले आहेत. तसेच पाकिस्तानने ९३६ वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे हे तीनच संघ सध्या असे आहेत, ज्यांनी ९०० हून अधिक वनडे सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

INDvsWI: भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, दीपक हुडाचे पदार्पण; ‘असे’ आहेत दोन्ही संघ

सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज

‘त्यावर्षानंतर भारतात एकदिवसीय क्रिकेटने गाठली वेगळीच उंची’, सचिनच्या १००० व्या सामन्यानिमित्त भावना व्यक्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---