---Advertisement---

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, क्रीडा क्षेत्रही हळहळले; वाचा दिग्गजांच्या प्रतिक्रिया

On: रविवार, फेब्रुवारी 6, 2022 10:44 AM
Lata-Mangeshkar
---Advertisement---

गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी (६ फेब्रुवारी) दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून क्रीडा क्षेत्रातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रद्धांजली वाहताना ट्वीट केले आहे की, ‘लता जी यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. त्यांच्या गाण्यांनी जगातील कोट्यावधी लोकांच्या मनात जागा मिळवली होती. तुमच्या संगीतातील योगदानासाठी आणि आठवणींसाठी धन्यवाद. त्यांच्या कुटुंबाप्रती आणि जवळच्या सदस्यांसाठी सहानुभूती व्यक्त करतो.’

https://twitter.com/imVkohli/status/1490184538152050689

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने देखील ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तिने लिहिले की, ‘महान गायिका लता मंगेशकरजी तुम्ही आमच्या मनात कायम राहाल. तुमच्या कुटुंबाप्रती सहानुभूती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती.’

https://twitter.com/imranirampal/status/1490181901671284736

भारतीय फुटबॉल संघाकडूनही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

https://twitter.com/IndianFootball/status/1490184441615896579

याशिवाय देखील अनेक खेळाडूंनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहीली आहे.

https://twitter.com/DineshKarthik/status/1490188613945987073

https://twitter.com/LovlinaBorgohai/status/1490184282991906818

https://twitter.com/GautamGambhir/status/1490191287483760641

https://twitter.com/venkateshprasad/status/1490185055242579968

https://twitter.com/virendersehwag/status/1490183506101637123

https://twitter.com/KirtiAzaad/status/1490185678792970241

https://twitter.com/bhogleharsha/status/1490179371516461061

https://twitter.com/SDhawan25/status/1490184131149402113

https://twitter.com/ajinkyarahane88/status/1490181434908168199

https://twitter.com/azharflicks/status/1490176315219386369

https://twitter.com/JockMore/status/1490188851133911041

लता मंगेशकर यांना २००१ साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना क्रिकेट या खेळाची नेहमीच आवड असल्याचे अनेकदा दिसून आले होते. त्यांनी अनेकदा भारतीय क्रिकेट संघासाठी, खेळाडूंसाठी ट्वीट केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं

भारताने ५ व्यांदा जिंकला १९ वर्षांखालील विश्वचषक, पाहा आत्तापर्यंतच्या विश्वविजेत्यांची संपूर्ण यादी

यश धूलच्या रुपात भारताला मिळाला पाचवा युवा विश्वविजेता कर्णधार, पाहा संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---