---Advertisement---

प्लेऑफमध्ये रोहित शर्माची अनोखी कामगिरी, आकडे पाहून विश्वास बसणार नाही!

On: शुक्रवार, मे 30, 2025 5:55 PM
Rohit Sharma
---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धा शेवटच्या अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. जिथे शुक्रवार (30 मे) रोजी एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना पाच वेळा चॅम्पियन्स ठरलेल्या मुंबईशी होणार आहे (gujrat Titans vs mumbai indians). पूर्ण स्पर्धेत शानदार प्रदर्शन केलेल्या गुजरात संघाने शेवटचे दोन लीग स्टेज सामने गमावून स्वतःच्या संघावर अडचण निर्माण करून घेतली आहे. संघाला आता मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना खेळायचा आहे. जिथे कोणताही संघ प्लेऑफ सारख्या मोठ्या सामन्यात मुंबई विरुद्ध खेळणे पसंत करत नाही. यावेळी सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा दिग्गज सलामीवीर रोहित शर्मावर असणार आहेत.

रोहित त्याचे आकडे बघून स्वतः निराश होईल त्याने आत्तापर्यंत 21 आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये 15.80 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 108.96 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे रोहितने आतापर्यंत प्लेऑफमध्ये एकही शतक झळकावले नाही, त्याच्या बॅटने फक्त दोन अर्धशतकी झळकली आहेत.

भारताला टी20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहितची प्लेऑफमध्ये सर्वोत्तम व्यक्तिगत धावसंख्या 68 धावा आहे, जी त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 2020 मध्ये केली होती. हे रेकॉर्ड बघता रोहित त्याच्या खेळीमध्ये निश्चित सुधार करेल. मुंबई इंडियन्स मधून रयान रिकल्टन, विल जॅक्स सारखे खेळाडू त्यांच्या देशात परत गेले आहेत. त्यामुळे रोहितवर खूप मोठी जबाबदारी आहे, तसेच चहात्यांनाही त्याच्याकडून अपेक्षा आहेत.

आयपीएल 2025 मध्ये रोहितचा फॉर्म उतार चढावांनी भरलेला राहिला आहे. त्याने 13 डावात 3 अर्धशतक झळकावले आहेत. तसेच 329 धावांसहित मुंबईसाठी तिसऱ्या क्रमांकावर जास्त धावा करणारा खेळाडू आहे. या हंगामात मुंबईसाठी सर्वात जास्त धावा सूर्यकुमार यादव आणि रिकल्टनने केल्या आहेत.

गुजरात विरुद्ध रोहितचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने गुजरात विरुद्ध सात डावांमध्ये वीस च्या सरासरीने 140 धावा केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---