---Advertisement---

लग्नानंतर रोहित विसरला होता ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, विराटने डंका पिटत सर्वांपुढे केलंत हसू

On: गुरूवार, जून 10, 2021 1:05 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा हा क्रिकेटविश्वातील सर्वात खतरनाक फलंदाज आहे. आपण रोहित शर्माला मैदानावर जल्लोषाने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना पाहिले आहे. परंतु तो आपल्या खाजगी आयुष्यात तितकाच आळशी आणि विसरभोळा देखील आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदा सांगितले खुलासे केले होते.

विराटने सांगितले होते की, ‘रोहित नेहमी पासपोर्ट, घड्याळ, मोबाईल फोन, टॅबलेट यासारख्या महत्वाच्या गोष्टी हॉटेलमध्ये किंवा संघाच्या बसमध्ये विसरतो. इतकेच नव्हे तर रोहितला उशिरा उठून उशिरा विमान पकडायची सवय आहे. रोहित शर्माच्या या आळशी आणि विसरभोळ्या स्वभावामुळे त्याच्यावर संघातील सर्व खेळाडू हसले होते. त्याचे कारण असे की, रोहितने आपल्या साखरपुड्याच्या वेळेस खोलीमध्येच अंगठी विसरला होता.’

रोहित आणि रितिका सजदेह यांचे लग्न 2015 मध्ये झाले होते. 2017 मध्ये ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या कार्यक्रमात रोहितने एक किस्सा होता सांगितला होता की, ‘रोहितचे नवीन नवीन लग्न झाले होते आणि त्याला विमान पकडायला उशीर होत होता. त्याला लग्नातील अंगठी सतत घालून ठेवायची सवय नव्हती. त्यामुळे तो रोज झोपताना अंगठी काढून झोपायचा आणि सकाळी उठल्यावर परत घालायचा. परंतु उशिरा उठल्यामुळे त्याला वेळेवर संघाची बस पकडायची होती. त्या गडबडीत तो अंगठी हॉटेलच्या रूममध्ये विसरला होता.”

रोहित पुढे म्हणाला की, “मी नेहमी सर्वांना सांगून ठेवतो की, सराव करायला किंवा विमानतळावर जाताना माझ्या रूमचा दरवाजा वाजवा किंवा मला कॉल करा. पण त्यादिवशी कोणीही मला आवाज दिला नव्हता. मला उशीर झाला आणि मी निघून गेलो.”

उमेश यादवला पाहिल्यावर रोहितला अंगठीची आठवण आली
रोहित शर्माने पुढे सांगितले की, “उमेश यादवला अंगठी घालायची सवय होती. त्याच्या हातामध्ये अंगठी पाहिल्यानंतर मला आठवण आली की, आपल्या हातामध्ये अंगठी नाही. त्यानंतर मी हरभजन सिंगची मदत घेतली होती. त्याचा त्या हॉटेलमध्ये एक ओळखीचा व्यक्ती होता. मी हरभजन सिंगला बाजूला घेऊन सांगितले की, मी हॉटेलच्या रूममध्येच अंगठी विसरलो आहे. तुमच्या ओळखीचा व्यक्ती आहे ना, त्याला सांगा की माझी अंगठी रूममध्येच राहिली आहे. त्याला अंगठी मिळेल. हळूहळू ही गोष्ट सर्वांना समजली. विराटने या गोष्टीला खूप मोठी बातमी बनवली होती.”

सध्या रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्यासाठी गेला आहे. या अंतिम सामन्यात तो उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी चाहत्यांना अशा आहे. १८ ते २२ जून या कालावधीत साथउम्पटन येथे हा सामना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

फाफ डू प्लेसिसचे धक्कादायक भाष्य; म्हणे, ‘टी२० लीग बनतील आंतराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोका’

मॉर्गन-बटलर कारकिर्दीतील सर्वात मोठं संकट उभं, ‘या’ कारणामुळे होऊ शकते कारवाई

केकेआरच्या कमिन्सची वेगळीच गंमत, पहिल्या भेटीत ‘किंग खान’ शाहरुखला ओळखलेसुद्धा नव्हते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---