---Advertisement---

‘माझी वाट लागली’, लाईव्ह सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार असा का म्हणाला? VIDEO व्हायरल

Rohit Sharma
---Advertisement---

इंग्लंड संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना इंगंलडने, तर दुसरा सामना मंगळवारी (5 फेब्रुवारी) भारताने जिंकला. पहिल्या दोन सामन्यानंतर कसोटी मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा नेहमीप्रमाणे मैदानातील आपल्या वागण्यामुळे चर्चेत राहिला. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर खेळला गेला. शेवटच्या डावात पाहुण्या संघाला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तिसऱ्या दिवसाखेर इंगलंडने आपल्या दुसर्या डावात 1 बाद 67 धावाही केल्या होत्या. कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांचा आत्मविश्वास पाहून इंग्लंड विजयासाठी खेळणार, हे निश्चित होते. पण सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांची जादू चालली. दिवसातील दुसऱ्याच संघात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सर्वबाद केले आणि सामना जिंकला.

सामन्याच्या चौथ्या दिवशी रोहत शर्मा (Rohit Sharma) याचे काही शब्द स्टंप माईकमध्ये कैद झाले. अक्षर पटेल त्यावेळी गोलंदाजी करत होता. इंग्लंडने चार विकेट्सच्या नुकसानावर 157 धावा केल्या होत्या. रोहित त्यावेळी स्लिप्समध्ये क्षेत्ररक्षणासाठी उभा राहणार होता. कर्णधार आपल्या जागेवर जाताना म्हणतो की, “माझ्या कळ्याची वाट लागली आहे, तुम्हाला ओरडा देऊन देऊन.” हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. पुढे मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारी, तर पाचवा सामना 7 मार्च रोजी सुरू होईल.  (Rohit Sharma’s funny video in Visakhapatnam Test against England is going viral)

महत्वाच्या बातम्या – 
IPL 2024 आधी धोनीने देवरी मातेचा घेतला आशीर्वाद! सर्जरीनंतर मैदानात करतोय पुनरागमन
IND vs ENG । बॅझबॉलच्या नादात जो रुट स्वतःचा खेळ विसरतोय? माजी कर्णधाराचा दावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---