भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मागच्या मोठ्या काळापासून धावा करण्यासाठी झगडत आहे. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही रोहित शर्मा निराशाजनक खेळी करताना दिसला आहे. असे असले तरी, मंगळवारी (16 मे) रोहितने मारलेल्या एका षटकारामुळे चाहत्यांच्या मने तृप्त झाली. आपल्या डावातील पाचव्याच चेंडूवर रोहितने हा पूल शॉट मारला.
आयपीएल 2023 हंगामातील पहिल्या 13 सामन्यांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त एक अर्धशतक करू शकला आहे. मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात रोहित मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये रोहित लयीत दिसत होता. मात्र, 25 चेंडूत 37 धावा करून त्याने विकेट गमावल्या. आपल्या खेळीत रोहितने 1 चौकार आणि एकूण तीन षटकार मारली. यादरम्यानत त्याने एक जबरदस्त पूल शॉट मारला.
युवा यश ठाकूर () मुंबईच्या डावातील तिसऱ्या षटकार गोलंदाजीला आला. यशने टाललेला पहिल्याच चेंडूवर रोहितने षटकार मारला. रोहितच्या डावातील हा पाचवा चेंडू होता. पहिल्या चार चेंडूंवर चार धावा केल्यानंतर रोहितने हा षटकार मारला आणि 10 धावांचा टप्पा गाठला. यशने टाकलेला हा चेंडू शॉर्ट असून रोहितने डीप मीडविकेटच्या दिशेने अप्रतिम पूल शॉट खेळला. रोहित त्याच्या पूल शॉटसाठी नेहमीच ओळखला जात आला आहे. या सामन्यात चाहत्यांना बऱ्याच दिवसांना अशा प्रकारचा शॉट रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाला.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबईला विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले. गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये हा सामना खेळा जात होता. जो संघ विजय मिळवेल, त्याचे प्लेऑफचे तिकीट पक्के होते. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने मार्कस स्टॉयनिस याच्या वादळी खेळीच्या जोरावर 3 बाद 177 धावा केल्या. (Rohit Sharma’s Pull Shot in match against LSG)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊला मोठा धक्का! 49 धावांवर असताना पंड्याने का सोडले मैदान? लगेच वाचा
जॉर्डनच्या चेंडूवर डी कॉकने दाखवली ताकद, एका हाताने षटकार मारताच नावावर झाला मोठा विक्रम