भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामान्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि ७३ धावांनी जोरदार विजय मिळवला. यासह टी२० विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेत न्यूझीलंड संघावर ३-० ने विजय मिळवला. या सामन्यात दीपक चाहरने एक गगनचुंबी षटकार मारला होता. हा षटकार पाहून रोहित शर्माने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा ठरतेय.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा आपल्या अप्रतिम गोलंदाजीसाठी ओळखला जातो. गोलंदाजीने संघाला विजय मिळवून देणारा हा गोलंदाज गरज भासल्यास फलंदाजी करूनही मोलाचे योगदान देत असतो. रविवारी (२१ नोव्हेंबर) न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात दीपक चाहरने ८ चेंडूंमध्ये नाबाद २१ धावांची खेळी केली.
दीपक चाहरच्या खेळी मध्ये २ चौकार आणि १ गगनचुंबी षटकाराचा समावेश होता. दीपक चाहरने ९५ मीटर लांब षटकार मारला. हा षटकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील आश्चर्यचकित झाला होता. हा षटकार पाहून रोहित शर्माने दीपक चाहरला सलामी दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Rohit Sharma saluting for Deepak Chahar 's heroic finish 🔥#INDvNZ | #Deepakchahar pic.twitter.com/Rew7C6BrPE
— `ash MSDian (@ashMSDIAN7) November 21, 2021
तिसऱ्या टी२० सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८४ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये रोहित शर्माने सर्वाधिक ५६ धावांचे योगदान दिले होते, तर ईशान किशनने २९ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १११ धावांवर कोसळला. ही मालिका भारतीय संघाने ३-० ने आपल्या नावावर केली. ही मालिका झाल्यानंतर आता २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अबूधाबी टी१० लीगमध्ये इंग्लिश फलंदाजाचा बोलबाला, सलग ४ षटकारांसह एका षटकात निघाल्या ३५ धावा
‘या’ पाच कारणांमुळे न्यूझीलंड संघ भारतासमोर झुकला, सलामीवीरांनी पार पाडली महत्वाची भूमिका
लेकाची काळजी! शोएब मलिकची मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे टी२० मालिकेतून तडकाफडकी माघार