भारतील गोलंदाजांना जरी मागील काही सामन्यांमध्ये धुतले असले तरी भारताचा एक फलंदाज विरोधी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत आहे. त्याने क्षेत्ररक्षकांनाही सळो की पळो करून सोडले आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. त्याच्या या जबरदस्त फॉर्मने विरोधी संघांना धडकी भरली आहे. त्याच्यावर आजीमाजी क्रिकेटपटूंनी कौतुकाचा वर्षाव केला असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या फॉर्मची चिंता व्यक्त केली आहे.
भारताने नुकतेच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) खेळला गेला ज्यामध्ये भारत 49 धावांनी पराभूत झाला. या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकल्याने मालिका 2-1ने जिंकली. या शेवटच्या सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबाबत आश्चर्यकारक विधान केले आहे.
“एका संघाच्या रूपाने आम्ही आधीच म्हटले होते परिणाम काहीही असो त्यामध्ये सुधारणा नेहमी करत राहणार आहोत. आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. बाकी संघ आव्हानात्मक कामगिरी करत आहेत. ते सर्वच विभागात उत्तम कामगिरी करू शकतात, त्यासाठी आम्हाला तयार असणे आवश्यक आहे, असे रोहित म्हणाला. हे बोलताना त्याने सूर्याचा फॉर्म चिंताजनक ठरत आहे, असे हसत म्हटले आहे.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1577387548162543617?s=20&t=PPtlJtTaq-7t10WQu505eA
“गोलंदाजीमध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. आम्ही सध्या दोन उत्तम संघाविरुद्ध खेळलो. तेव्हा आम्हाला अनेक आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जावे लागले. त्यानुसार आम्ही उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांना स्पष्टपणा हवा असतो, त्यांच्यासाठी एवढेच की आम्ही निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असून त्यानुसार जबाबदारीही पार पाडत आहोत,” असेही रोहितने पुढे म्हटले आहे.
3⃣ Matches
1⃣1⃣9⃣ Runs
2⃣ Match-defining knocksFor his batting brilliance, @surya_14kumar wins the Player of the Series award. 👌 👌 #TeamIndia | #INDvSA | @mastercardindia pic.twitter.com/dQjaBuWAnT
— BCCI (@BCCI) October 4, 2022
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकासाठी आता टीम इंडियाचा ‘प्लॅन बी’! ‘या’ खेळाडूंच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी
T20WC: बुमराहच्या रिप्लेसमेंटबाबत कॅप्टन रोहितचे बडेबोल! म्हणाला, ‘जसप्रीतची जागा घेण्यासाठी…’