भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, वनडे व टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.
त्याने १ जानेवारी २०१५पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१४, वनडेत १६९, कसोटीत ४५ तर टी२०मध्ये १०० षटकार मारले आहेत.
२००७ साली वनडे पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने २०१३ पूर्वी ८६ सामन्यात केवळ २३ षटकार खेचले होते. २००७ ते २०१३ हा काळ रोहितसाठी अतिशय कठीण राहिला होता.
रोहितने वनडेत २०१३ (२२), २०१४ (२२), २०१५(२३), २०१६(१९), २०१७ (३३), २०१८ (३९) २०१९(३६) व २०२०(६) असे षटकार खेचले आहेत.
१ जानेवारी २०१५ पासून वनडेत रोहित पाठोपाठ षटकार मारण्यात दुसऱ्या क्रमांकावर ऑयन माॅर्गन असून त्याने २०१५ ते २०२० या काळात १०६ वनडेत १२८ षटकार खेचले आहेत.
भारतीय संघ व्यवस्थापनाने २०१३मध्ये रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो एक चांगला निर्णय ठरला. या खेळाडूने वनडे कारकिर्दीत २९ शतके केली आहेत त्यातील २४ ही २०१५ ते २०२० या काळात केली आहेत.
महत्त्वाचे लेख-
- ७ असे खेळाडू ज्यांच्याबरोबर रोहित खेळला आहे क्रिकेट, पण नाव कुणालाही नाही आठवत
- ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया
- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू