---Advertisement---

IND vs ENG । विजयानंतर भारत फूल कॅन्फिडेंसमध्ये! तिसऱ्या कसोटीआधी रोहितचे मोठे विधान

Rohit-Sharma-Press
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या डावात इंग्लंडला 399 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण 69.2 षटकांमध्ये 292 धावा करून सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराह याला सामनावीर निवडले गेले. तर त्याचसोबत यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांची भूमिकाही महत्वाची राहिली. कर्णधार रोहित शर्मा याने विजयानंतर खास प्रतिक्रिया दिली.

इंग्लंडविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटीत विराट कोहली, केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या तीन महत्वाचे खेळाडू खेळत नव्हते. राहुल आणि जडेजा दुखापतीमुळे, तर विराट वैयक्तिक कारणास्तव या सामन्यात खेळला नाही. असात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) युवा खेळाडूंनी भरलेल्या संघासोबत विशाखापट्टणमच्या वायझॅक स्टेडियमवर उतरला. इंग्लंडच्या तुलनेत भारतीय संघाकडे आनुभव कमी होता. पण निकाल तरीही भारताच्याच बाजूने लागला. कर्णधारासह प्रत्येकासाठी युवा खेळाडूंनी मिळवलेला हा विजय महत्वाचा ठरला.

हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “या सामन्यातील विजयामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. युवा खेलाडूंच्या या संघाचा अभिमान वाटतोय. पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर या खेळाडूंना चांगले पुनरागमन केले. यांना फक्त खेळण्याचे स्वातंत्र्य आणि थोडा वेळ देण्याची गरज आहे. जसप्रीत बुमराह आमच्यासाठी चॅम्पियन खेळाडू राहिला आहे. एकंदरीत कामगिरी पाहिली, तर आम्ही फलंदाजी देखील चांगली केली.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल याने 209 धावांची खेळी केली. तसेच गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह याने 6 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात भारतीय संघ 396 , तर दुसऱ्या डावात 255 धावा करू शकला. दुसरीकडे इंग्लंडने पहिल्या डावात 253 आणि दुसऱ्या डावात 292 धावांपर्यंत मजल मारली. (Rohit Sharma’s statement after winning the second Test against England)

महत्वाच्या बातम्या – 
खरं सोनं! इंग्लिश खेळाडूचा त्रिफळा उडवत बुमराहने संपवली कसोटी, पाहुण्यांचा 106 धावांनी पराभव
Safa Baig’s Face । इरफान पठाणमे पूर्ण केली चाहत्यांची इच्छा, खास दिवशी पहिल्यांदाच दाखवला पत्नीचा चेहरा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---