भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात ४ मार्चपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदाच कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. मात्र, त्यापूर्वी तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. मंगळवारी रोहितचे काही ट्वीट्सची बरीच चर्चा झाली.
रोहितच्या ट्विटर अकाऊंटवर मंगळवारी काही असे ट्वीट (Rohit Sharma Tweet) करण्यात आले, की चाहत्यांनी त्याचे अकाऊंट हॅक झाले असावे असा कयास लावण्यास सुरुवात केली. तसेच रोहितच्या या ट्वीट्सवर चाहत्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
भारतीय कर्णधार रोहितच्या ट्विटर अकाऊंटवर पहिले ट्वीट करण्यात आले की, ‘मला नाणेफेक करायला आवडते, विशेषत: जेव्हा नाणे माझ्या पोटात जाते.’ तसेच रोहितने दुसरे ट्वीट केले की, ‘तुम्हाला माहित आहे का की मधमाशी एक उत्तम बॉक्सिंग बॅगचे काम करते.’ याशिवाय आणखी एक ट्वीट करण्यात आले, ज्यात लिहिले होते की, ‘क्रिकेटचे चेंडू खाण्यालायक असतात, खरंय ना?’
रोहितच्या अकाउंटवर आलेले हे ट्वीट पाहून अनेकांना प्रश्न पडला की, त्याने अशाप्रकारचे ट्वीट का केले आहेत. तसेच हे ट्वीट्स पाहून अनेकांनी त्याचे अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज बांधला आहे (Rohit Sharma’s Twitter Account Hacked?)
Some Rohit hater might have hacked this acc😉 https://t.co/XKULkRlmsE
— Geofinn_12 (@12Geofinn) March 1, 2022
https://twitter.com/IAS_AYUSH_SINGH/status/1498622550368481283
Referee looking for the coin
Rohit: https://t.co/7GyFP27J2y pic.twitter.com/8XIbgSgavP
— Yash (@iam_yashhh) March 1, 2022
Hacked account😂😂#Hacked https://t.co/07RvVzEddS
— Arslan Khichi Journalist (@ArslanKhichi13) March 1, 2022
इतकंच नाही, भारतीय संघातील रोहितचे संघसहकारी युजवेंद्र चहल आणि आर अश्विन यांनीही रोहितच्या या ट्वीट्सवर प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केले आहे. चहलने रोहितच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली की, ‘भैय्या? काय झालं आहे? सर्व ठिक आहे ना?’ तसेच अश्विनने रोहितची फिरकी घेत प्रतिक्रिया दिली की, ‘चल फक्त असं म्हण, की खाण्यासाठी आणखी चांगले पर्याय आहेत.’
आता रोहितच्या या ट्वीट्समागील नक्की काय कारण आहे, हे अद्याप उघड झालेले नाही. त्यामुळे रोहित यावर काही स्पष्टीकरण देणार का, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Let’s just say there are better appetising options. 💁♂️😂 https://t.co/5ORwN9kWnL
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 1, 2022
Bhaiya? What’s happening, Sab theek hai na? https://t.co/yXDLithw6f
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) March 1, 2022
रोहित पहिल्यांदाच करणार कसोटीत नेतृत्त्व
जानेवारी महिन्यात विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व सोडले होते. त्यामुळे रोहितकडे मर्यादीत षटकांनंतर कसोटी प्रकारासाठीही भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. विशेष म्हणजे रोहितने यापूर्वी कधीही कसोटीमध्ये भारताने नेतृत्त्व केलेले नाही. त्यामुळे ४ मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित पहिल्यांदाच कसोटी कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला विश्वचषक ते आयपीएल २०२२, मार्च महिना क्रिकेटप्रेमींसाठी ठरणार आहे पर्वणी
श्रीसंतला गंभीर दुखापत! थेट हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो