भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अगदी रोमांचक सुरू आहे. अशा परिस्थितीत सामन्यातील प्रतिकेय बॉलवर काहीना काही विशएष घडत आहे. असंच काहीसं घडलं सामन्याच्या दुसऱ्या डावातील 18व्या षटकात. भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोई गोलंदाजी करत होता. त्यावेळी चोथ्या बॉलवर आसिफ अली फलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सोपा झेल सोडला. त्यामुळे भारतीय संघावरील दबावात वाढ झाल्याचं दिसून आलं.
Check #RohitSharma Face Expression 😂😂🙏#INDvPAK#Rizwan#INDvsPAK2022 pic.twitter.com/pfzun0p8D0
— Zada Khan (@ZadaSrk) September 4, 2022
भारताने संपूर्ण सामन्यात विशेष खेळी केली. मात्र, सामना शेवटाकडे आला त्यावेळी भारताच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात चूका केल्याचं दिसून आलं. यामध्ये सर्वात मोठी चूक ठरली ती अर्शदीप सिंगने सोडलेला झेल. अर्शदिपने सामन्याच्या महत्वाच्या वेळी आसिफ अलीचा अगदी सोपा झेल सोडला. त्यानंतर अर्शदीपने टाकलेल्या शेवटच्या षटकांत याच आसिफने अर्शदीपच्या डोक्यावरून एक मह्त्वाचा चौकार लगावत पाकिस्तानला सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. शेवटी 20व्या षटकातील चोथ्या चेंडूवर अर्शदीपने आसिफ अलीला पायचित बाद केले. आणखी सामन्यात आणखी रोमांच आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंतत: भारताला या सामन्यात 5 विकेट आणि 1 चेंडू बाकी राखत पराभव पत्कारावा लागला. भारत या सामन्यात हरल्यानंतर आता नेटकऱ्यांनी हार्दिक पंड्या रिषभ पंत अन् अर्शदीप सिंग यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, भारताचा पुढील सामना सुपर 4 मध्ये ब गटातून पुढे आलेल्या श्रीलंकेविरुद्ध आयोजित आहे. हा सामना मंगळवार 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताची अंतिम सामन्यात धडक मारण्याची आशा जिवंत राहिल. याशिवाय पाकिस्तानी संघाने देखील आगामी 2 सामन्यात विजय मिळवल्यास येत्या रविवारी (11 सप्टेंबर) पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा रोमांचक सामना आशिया चषकाच्या फयनलमध्ये पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: राजाचं राजपण कालपण आजपण! क्लासिक कोहलीचे धमाकेदार अर्धशतक
‘ही संधी म्हणजे माझ्यासाठी मोठी बाब!’, एनसीएतील युवकांना मिळाले बुमराहचे मार्गदर्शन
INDvsPAK: राहुलचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! चांगल्या सुरुवातीनंतर धरला पव्हेलियनचा रस्ता