---Advertisement---

ज्या रोहितने भारताला सामना जिंकून दिला त्याचाच विक्रम आज मार्टिन गप्टिलने मोडला

On: बुधवार, जानेवारी 29, 2020 7:07 PM
---Advertisement---

आज (29 जानेवारी) सेडन पार्क (Seddon Park), हॅमिल्टन (Hamilton) येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात सुुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी  (Lead by 3-0 In T20I) आघाडी घेतली आहे.

या सामन्यात न्यूझीलंडला पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांचा सलमीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलने एक खास विक्रम करत (Martin Guptill) भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकले आहे.

गप्टिलने या सामन्यात भारताने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 21 चेंडूत 31 धावा केल्या. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2500 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो विराट कोहली आणि रोहित शर्मा नंतरचा तिसराच फलंदाज ठरला आहे. त्याने 83 व्या आंतरराष्ट्रीय टी20 डावात खेळताना हा कारनामा केला आहे.

त्यामुळे आता त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 86 सामन्यातील 83 डावात 33.28 च्या सरासरीने 2530 धावा झाल्या आहेत. त्याचमुळे तो आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कमी डावात 2500 धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना रोहितला मागे टाकले आहे.

रोहितने 92 डावात हा टप्पा गाठला होता. या यादीत अव्वल क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) असून त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2500 चा पल्ला हा कारनामा अवघ्या 68 डावांमध्ये पूर्ण केला होता.

#आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये जलद 2500 धावा करणारे फलंदाज (डाव)-

68 डाव- विराट कोहली

83 डाव- मार्टिन गप्टिल

92 डाव- रोहित शर्मा

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

2783 धावा – विराट कोहली (81 सामने)

2713 धावा – रोहित शर्मा (107 सामने)

2530 धावा – मार्टिन गप्टिल (86 सामने)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---