भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकला सुरुवात होण्यास काही तासच शिल्लक राहिले आहेत. मात्र, त्याआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला. दुखापतीतून सावरत या मालिकेसाठी सज्ज झालेला अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पुन्हा एकदा फिटनेसच्या कारणाने मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून बुमराहसह नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना एकत्रित भारतीय संघासाठी खेळताना पाहण्याकरिता चाहत्यांना आणखी वाट पहावी लागेल.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेकडे वनडे विश्वचषक मोहिमेची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. वर्षातील या पहिल्याच मालिकेत संपूर्ण ताकदवर संघ उतरवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतलेला. त्यासाठी विश्वचषकापासून संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराह याला देखील संघात सामील केलेले. मात्र, पुन्हा एकदा फिटनेसच्या कारणाने त्याने विश्रांतीची मागणी केली. त्याची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
बुमराह, रोहित व विराट हे भारताचे प्रमुख तीन खेळाडू अखेरच्या वेळी मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर एकत्र खेळलेले. लॉर्ड्स येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला 100 धावांनी पराभव पत्करावा लागलेला. त्याआधी देखील वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही त्रिमूर्ती एकत्र खेळताना दिसलेली. विश्वचषकाचा विचार केल्यास या सर्व प्रमुख खेळाडूंना एकत्रित खेळणे गरजेचे आहे. परंतु, बुमराह मैदानावर कधी परत तो याकडे सर्वांचे पुन्हा एकदा लक्ष लागून राहिल.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
(Rohit Virat And Bumrah Play Together Only Twice In One Year)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कॉलेजला गेलो नाही, पण…’, शिक्षण व्यवस्थेविषयी धोनीने स्पष्ट भूमिका
‘मी काय करतोय, हे मला माहितीये…’, पाहा पत्रकाराच्या कोणत्या प्रश्नावर भडकला बाबर आझम