विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघासाठी गेम चेंजर असेल. रोहित आपल्या घरच्या मैदानावर मोठे शतक झळकावेल आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून संघाला अंतिम फेरीत नेईल, असा विश्वास श्रीशांतला आहे.
भारताने साखळी टप्प्यातील सर्व नऊ सामने जिंकून आणि गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर न्यूझीलंडने पाच विजय आणि चार पराभवांसह चौथ्या स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, आयसीसी नॉकआऊटमध्ये न्यूझीलंडने अनेकवेळा भारताचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे.
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या एस श्रीसंत (S Shreesanth) याला पहिल्या उपांत्य फेरीत चमकदार कामगिरी करू शकेल अशा एका खेळाडूची निवड करण्यास सांगण्यात आले. प्रत्युत्तरात त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे नाव घेत तो म्हणाला, “शर्माजींचा मुलगा रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो. आशिया चषकात त्याने शानदार खेळी खेळली आहे आणि मला वाटते यातही तो त्याच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळेल. तो चांगला खेळेल आणि प्रेक्षकही त्याला साथ देतील. 2011 मध्ये, तो संघात येण्यास पात्र होता, परंतु त्याची निवड झाली नाही. ते त्याच्या मनात असेल. मला वाटते की भारत उपांत्य फेरी जिंकेल आणि रोहित आणखी एक शतक करून अहमदाबादला जाईल”
भारतीय कर्णधाराने सध्याच्या स्पर्धेत आपल्या आक्रमक पध्दतीने बरेच यश मिळवले आहे आणि त्याने खूप धावाही केल्या आहेत. त्याच्या नावावर कमी मोठ्या पण प्रभावी खेळी आहेत. विराट कोहलीनंतर रोहितने साखळी फेरीत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने नऊ डावांत 503 धावा केल्या आणि त्याची सरासरी 55.88 होती. त्याचवेळी त्याचा स्ट्राइक रेट 121.49 होता. एक शतक आणि तीन अर्धशतकांच्या खेळीही त्याच्या बॅटमधून आल्या. अशा स्थितीत त्याच्याकडून या सामन्यातही चांगली कामगिरी करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावण्याची अपेक्षा आहे. (Rohit will be against New Zealand the former player big reaction about the Indian captain)
म्हत्वाच्या बातम्या
World-cup Semifinal: टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध टेन्शनमध्ये, पाहा कुणी केलाय दावा
World-cup Semifinal: टॅास जिंकल्यावर ‘हाच’ निर्णय घ्या, गावसकरांचा रोहितला सल्ला