इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावातील लक्षवेधी चेहऱ्यांपैकी एक राहिला, वेस्ट इंडिजचा रोमारियो शेफर्ड.
वेस्ट इंडिजच्या या वेगवान गोलंदाजाला विकत घेण्यासाठी आयपीएलमधील २ सर्वात यशस्वी संघ भिडले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शेफर्डला विकत घेण्यासाठी चांगलीच चढाओढ झाली. पुढे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनीही शर्यतीत उडी घेतली. अखेर सनरायझर्स हैदराबादने ७ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले आहे.
https://twitter.com/IPL/status/1492816096323604482?s=20&t=PJw2jKPest-K0mzeSQ4nRg
वेस्ट इंडिजच्या या २७ वर्षीय वेगवान गोलंदाजाला आयपीएलचा अनुभव नाही. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून १४ टी२० आणि १० वनडे सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या बाजारात ‘विश्वविजेत्या’ कर्णधारांना नाही मिळाली किंमत
पंजाबचे धन्यवाद, पण मला चेन्नईकडून अपेक्षा होत्या; शाहरुख खानने केल्या भावना व्यक्त